One Piece Netflix : 'वन पीस' लाईव्ह अ‍ॅक्शन सीरीजचा दुसरा सीझन येणार! नेटफ्लिक्सची मोठी घोषणा

One Piece Live Action : आठ एपिसोड्सची ही सीरीज रिलीजनंतर कित्येक देशांमध्ये टॉपला पोहोचली आहे
One Piece Netflix Season 2
One Piece Netflix Season 2eSakal
Updated on

One Piece Season 2 : 'वन पीस' या जगप्रसिद्ध मांगा आणि अ‍ॅनिमे सीरीजचं लाईव्ह अ‍ॅक्शन व्हर्जन नेटफ्लिक्सने मागील महिन्यात रिलीज केलं होतं. आठ एपिसोड्सची ही सीरीज रिलीजनंतर कित्येक देशांमध्ये टॉपला पोहोचली आहे. ही लोकप्रियता पाहता, नेटफ्लिक्सने याचा दुसरा सीझन येणार असल्याची घोषणा केली आहे.

31 ऑगस्ट रोजी नेटफ्लिक्सवर ही सीरीज रिलीज करण्यात आली होती. इचिरो ओडा (Eiichiro Oda) या मांगा (जपानी कॉमिक) आर्टिस्टने बनवलेली ही मांगा सीरीज १९९७ साली प्रदर्शित झाली होती. यानंतर काही वर्षांनी टोई अ‍ॅनिमेशन या कंपनीने याचं अ‍ॅनिमे व्हर्जन प्रदर्शित केलं. यावरच आधारित हा नेटफ्लिक्स शो आहे. अर्थात, याच्या कथेमध्ये काही बदल करण्यात आले आहेत.

One Piece Netflix Season 2
Pokemon GO Hindi : आता हिंदीमध्ये खेळता येणार 'पोकेमॉन गो' मोबाईल गेम; भारतातील यूजर्स वाढवण्यासाठी मोठा निर्णय

समुद्रातील पायरेट्सबद्दल असणारी ही सीरीज जगातील सर्वात प्रसिद्ध मांगा आणि अ‍ॅनिमे समजलं जातं. लाईव्ह अ‍ॅक्शन सीरीज देखील अवघ्या काही दिवसांमध्येच जगातील कित्येक देशांमध्ये टॉपला पोहोचली आहे. भारतात देखील नेटफ्लिक्सवर ही सीरीज सध्या टॉप-10 मध्ये आहे.

दुसरा सीझन येणार

या सीरीजचा पहिला सीझन प्रसिद्ध झाल्यामुळे आता नेटफ्लिक्सने दुसरा सीझन येणार असल्याचं घोषित केलं आहे. इचिरो ओडाच्या आवाजातच एक व्हिडिओ प्रसिद्ध करत नेटफ्लिक्सने याबाबत माहिती दिली आहे. या शोचे कदाचित पुढे 12 सीझन येऊ शकतात असंही माध्यमांमध्ये म्हटलं जात आहे.

काय आहे वन पीस?

या शोमध्ये मुख्य पात्र असणारा लुफी (Luffy) हा एक किशोरवयीन मुलगा आहे. जगातील सगळ्या पायरेट्सना हरवून 'पायरेट किंग' होण्याचं त्याचं स्वप्न आहे. यासाठी तो एका छोट्याशा नावेतून आपला प्रवास सुरू करतो. या प्रवासात त्याला कित्येक चांगले मित्र भेटतात, जे त्याच्या 'स्ट्रॉ हॅट पायरेट' (Straw Hat Pirates) क्रूमध्ये सहभागी होतात.

One Piece Netflix Season 2
Libya Flood : मृतदेहांचा रस्त्यावर खच,मदतीची केविलवाणी प्रतीक्षा, युद्धाच्या आगीतून बाहेर पडणारा लिबिया आता पूराच्या फुफाट्यात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.