Netflix Movies, Shows Struggle To Attract India Subscribers
Netflix Movies, Shows Struggle To Attract India SubscribersGoogle

भारताला कमी लेखणं Netflix ला भोवलं; बंद पडण्याची चिन्ह?

नेटफ्लिक्सच्या अनेक गुंतवणुकदारांनी देखील भारतातील अपयशाबद्दल निराशा व्यक्त केली आहे.
Published on

नेटफ्लिक्स(Netflix) हे ओटीटी(Ott) वरचं एकेकाळचं महागडं पण आघाडीचं अॅप. खरंतर जगभरात नेटफ्लिक्सनं आपला दबदबा सुरुवातीपासूनच निर्माण केला होता पण भारतात मात्र नेटफ्लिक्सला लॉंच झाल्यापासून पहिल्या हीटसाठी तब्बल दोन-अडीच वर्ष वाट पहावी लागली. भारतीय-अमेरिकन लेखक विक्रम चंद्रा यांच्या कादंबरीवर आधारित 'सेक्रेड गेम्स' या हिंदी भाषेतील नेटफ्लिक्स सीरिजनं तुफान बिझनेस केला. लोकांनी याच्या पहिल्या भागाला जितका प्रतिसाद दिला,तितकंच दुसऱ्या भागालाही डोक्यावर उचलून धरलं. मुंबईतील क्राइमचं जग इतकं भडकपणे मांडूनही प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला. कैक लोकांनी तर सेक्रेड गेम्सच्या यशानंतर पटापट नेटफ्लिक्सचं सदस्य बनणं पसंत केलं.

Netflix Movies, Shows Struggle To Attract India Subscribers
खोटा आहे सलमान खान,कोर्ट म्हणालं,'खरं बोलतोय अभिनेत्याचा NRI शेजारी'

भारतात मिळालेल्या त्या यशानंतर नेटफ्लिक्सनं नवनवीन प्लॅन आखले. जगभरात कॅनडा ते जपान मध्ये नेटफ्लिक्सनं आखलेले प्लॅन काम करुन गेले. त्यांना टार्गेट ऑडिअन्स सहज प्राप्त झाला पण भारतात मात्र नेटफ्लिक्सची गणितं चुकली. कंपनीनं जगभरात बिझनेस वाढण्यासाठी लागू केलेले तेच नियम,तेच प्लॅन्स भारतात काम करुन गेले नाहीत असं चित्र आता दिसून येत आहे. १०० मिलियन्स सबस्क्रायबर्सच्या संख्येवर शिक्कामोर्तब केलेल्या नेटफ्लिक्सचे भारतात आता चार वर्षानंतर केवळ ५.५ मिलियन सबस्क्रायबर्स आहेत असं आशियातील नेटफ्लिक्सच्या मीडिया पार्टनर्सचा अभ्यास सांगतो. नेटफ्लिक्सनं सेक्रेड गेम्सचा दुसरा भाग यशस्वी झाल्यानंतर तिसऱ्या भागाविषयी चर्चाच केली नाही. तसंच,त्यांचे इतरही पहिल्या सीझनमध्ये गाजलेले शो नंतर कॅन्सल करण्यात आले. नेटफ्लिक्सच्या अनेक गुंतवणुकदारांनी देखील भारतातील अपयशाबद्दल निराशा व्यक्त केली आहे. आता सुर उमटतोय की नेटफ्लिक्सनं भारताकडे दुर्लक्ष केलं म्हणून त्यांच्या वाट्यला अपय़श येतंय.

Netflix Movies, Shows Struggle To Attract India Subscribers
रणधीर कपूरना 'Dementia' आजार; रणबीरकडे केली ऋषी कपूरना भेटायची विनंती

इतर ओटीटी अॅपनं नेटफ्लिक्सच्या पुढे उडी मारल्याचं चित्र सध्या स्पष्टपणे दिसत आहे. त्यात डिस्ने हॉटस्टार,अॅमेझॉन प्राइम यांचा प्रामुख्यानं उल्लेख केला जातोय. नेटफ्लिक्सनं यासाठी सबस्क्रिब्शन चार्जही कमी करून पाहिल्या आहेत पण तरिही अद्याप स्ट्रगल कायम आहे. पण यातही नेटफ्लिक्सनं लोकांचा नाही आपलाच फायदा पाहिलाय अशी बातमी समोर आली. आता लोकल निर्माते,दिग्दर्शक,लेखक अशी टीम एकत्र करुन नवनवीन विषय आणण्याच्या प्रयत्नात नेटफ्लिक्स आहे. पण तरीही अनेक चॅलेंजेस भारतात त्यांच्या वाटेत अडथळा आणत आहेत.

Netflix Movies, Shows Struggle To Attract India Subscribers
हृतिकच्या मेहुणीला उर्फीनं फटकारलं; म्हणाली,'असेल हिम्मत तर...'

कोव्हिड काळात जेव्हा थिएटर बंद होते तेव्हा ओटीटी बिझनेस वाढवण्याची मोठी संधी गवसली होती. कारण लोकांना घरी बसून मनोरंजन अनुभवण्याचं ओटीटी हे एक तगडं माध्यम होतं. पण इथेही भारतात उशीरानं हाथपाय हलवल्यानं नेटफ्लिक्स मागे पडलं. खरंतर तेव्हा लोकल निर्माते,दिग्दर्शक,लेखक यांच्या साथीनं भारतात नेटफ्लिक्सला पुन्हा जम बसवता आला असता पण नेटफ्लिक्सला ते जमलं नाही. नेटफ्लिक्सनं २०२१ मध्ये प्लॅन केलेले शोज उशिर होवून २०२२ मध्ये भेटीस येत आहेत. आता नेटफ्लिक्स डोळे लावून बसलंय एका हीट नंबरकडे ज्यानं भारतात पुन्हा ते स्पर्धेत सामिल होऊ शकतील अन् प्रेक्षकांचा ओढा आपल्याकडे वळवतील. आता नुकताच प्रदर्शित झालेल्या माधुरीच्या 'द फेम गेम'नं नेटफ्लिक्सच्या आशा पल्लवीत केल्यात खरं पण 'मंजिल अभी बहुत दूर है' हे नेटफ्लिक्सला वेळीच कळायला हवं. अन् भारतातील बिझनेसकडेही गांभीर्यानं लक्ष द्यायला हवं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()