नाट्यकर्मी म्हणून असलेली अंगभूत ऊर्जा घेऊन , ज्येष्ठ नाट्यकर्मी दिग्दर्शक विजय केंकरे गेली ४० वर्षे रंगभूमीवर कार्यरत आहेत वेगवेगळ्या शैलीतील नाटकं प्रभावीपणे प्रेक्षकांपर्यंत पोहचविणारे विजय केंकरे आता ‘काळी राणी’ या आपल्या नव्या नाटकासहित आपल्या नाटयकारकिर्दीचं शतक साजरं करतायेत.
‘काळी राणी’ हे त्यांच १०० व नाटकं ११ डिसेंबरला रंगभूमीवर येतयं. या नाटकाची खासियत म्हणजे विजय केंकरे यांचे जसे १०० वे नाटक आहे तसेच या नाटकाशी संबधित असलेल्या कलाकार तंत्रज्ञ यांनीही या नाटकाद्वारे आपल्या नाटयकारकिर्दीचे वेगवेगळे टप्पे गाठले आहेत. रत्नाकर मतकरी यांचे ९० वे नाटक, प्रदीप मुळ्ये २०० वे नाटक, अजित परब ४० वे नाटक शीतल तळपदे १२५ वे नाटक, मंगल केंकरे ५० वे नाटक वे नाटक राजेश परब ५० वे नाटक, अक्षर शेडगे १४०० वे नाटक आणि डॉ. गिरीश ओक यांचे ५१ वे नाटक. असा भन्नाट योग ‘काळी राणी’ या नाटकाने साधला आहे.
‘काळी राणी’ या नाटकात मनवा नाईक, हरीश दुधाडे, आनंद पाटील, चंद्रलेखा जोशी, आणि डॉ. गिरीश ओक यांच्या भूमिका आहेत. ‘ऑल दि बेस्ट’ ‘हमिदाबाईची कोठी’, ‘हॅम्लेट’ नंतर मनवा नाईक हीचं ‘काळी राणी’ हे नवीन नाटक आहे. डॉ. गिरीश ओक यांचा ६६६६ वा प्रयोग या नाटकाद्वारे रंगणार आहे.
हे नाटक आहे..एका राणी च..जिचं स्वप्न आहे.. मायानगरी मधल्या रंगीबेरंगी दुनियेवर राज्य करण्याचं, एका अश्या लेखकाचं आहे.. ज्याचा प्रत्येक चित्रपट सिल्व्हर जुबली आहे ..ज्याच्या साठी फक्त स्वतःचं नावच सर्वस्व आहे. हे नाटक एका निर्मात्याचं आहे.. ज्यांनी ह्या दोघांना चित्रपट सृष्टीची सफर घडवलेली आहे. अशा एकमेकांच्या स्वप्नांत अडकलेल्या तीन व्यक्ती तुमच्या भेटीला येणार आहेत. ‘काळी राणी’ ह्या दोन अंकी नाटकामधून.
मल्हार आणि दिशा निर्मित ‘काळी राणी’ या नाटकाचे लेखन रत्नाकर मतकरी यांचे असून दिग्दर्शन- विजय केंकरे यांचे आहे. नेपथ्याची प्रदीप मुळ्ये तर प्रकाशयोजनेची जबाबदारी शीतल तळपदे यांनी सांभाळली आहे. संगीत अजित परब यांचे असून वेशभूषा मंगल केंकरे यांची आहे. रंगभूषा राजेश परब यांची असून वेशभूषा संध्या खरात यांची आहे सूत्रधार संतोष शिदम आहेत. या नाटकाचे निर्माते प्रिया पाटील,डॉ. माधुरी सरनाईक, अनिता महाजन, ऋतुजा शिदम आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.