Nick Jonas Video Viral: लाईव्ह परफॉर्मन्स दरम्यान स्टेजवर कोसळला प्रियंकाचा नवरा निक जोनस! पुढं काय घडलं पहा

प्रियांका चोप्राचा पती निक जोनास स्टेजवरून खाली पडला. या घटनेचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.
Nick Jonas Video Viral: लाईव्ह परफॉर्मन्स दरम्यान स्टेजवर कोसळला प्रियंकाचा नवरा निक जोनस! पुढं काय घडलं पहा
Updated on

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्राचा पती आणि प्रसिद्ध अमेरिकन गायक निक जोनस सध्या त्याच्या कॉन्सर्टमुळे चर्चेत आहे. या लाईव्ह कॉन्सर्टचे अनेक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत. या शोसाठी त्याची पत्नी प्रियांका चोप्रा देखील त्याच्यासोबत दिसली. प्रियांका ही नेहमीच पतीच्या प्रत्येक कॉन्सर्टचा भाग असतेच.

यात ती खूप एन्जॉय करताना दिसत आहे. पतीचा कॉन्सर्ट एकून त्याच्या चाहत्यांची गर्दी पाहून ती भारावली होती. तिचा एक व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता ज्यात ती रडताना दिसली होती. दरम्यान, आता निक जोनासचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात तो गाणं गाण्यात इतका गुंग झाला की तो स्टेजवर पडला.

जोनस आणि त्याचा भाऊ हे मॅसॅच्युसेट्सच्या बोस्टन येथील टीडी गार्डनमध्ये कॉन्सर्ट करत असताना ही घटना घडली. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली. सध्या हा व्हिडिओ इंटरनेटवर चांगलाच व्हायरल होत आहे.

Nick Jonas Video Viral: लाईव्ह परफॉर्मन्स दरम्यान स्टेजवर कोसळला प्रियंकाचा नवरा निक जोनस! पुढं काय घडलं पहा
Sai Lokur Pregnant: नवखी चाहूल, इवलं पाऊल.. बिग बॉस फेम मराठमोळी अभिनेत्री सई लोकूरने दिली गुड न्युज

निक जोनास गाण्यावर नाचत चाहत्यांच्या जवळ पोहोचला, त्यामुळे मागे स्टेज संपला याकडे त्याचे लक्षच नव्हते. तो मागे फिरत होता आणि तो स्टेजवरच पडला.

निक जोन्स खाली पडताच एक सुरक्षा रक्षक ताबडतोब त्याच्या मदतीसाठी गेला, पण तोपर्यंत तो स्वतःहून उठला. तो पडल्याने त्याला लागले की काय अशी चिंता त्याच्या चाहत्यांना होती मात्र निक लगेचच उठला आणि पुन्हा परफॉर्म करू लागला.

या व्हायरल व्हिडिओत निक जोनस गाणं गात आपल्या भावांकडे परत गेला. यावेळी निक पांढरा शर्ट आणि पिवळी पँट घातलेला दिसत आहे.

Nick Jonas Video Viral: लाईव्ह परफॉर्मन्स दरम्यान स्टेजवर कोसळला प्रियंकाचा नवरा निक जोनस! पुढं काय घडलं पहा
Gadar 2 Box Office Collection Day 6: 65 वर्षाचा सनी सगळ्यांवर पडला भारी! गदर2 च्या कमाईला ब्रेक नाहीच...

याआधी, एक व्हिडिओ समोर आला होता ज्यामध्ये निक स्टेजवर गाताना दिसत होता आणि देसी गर्ल भावूक झाली होती. हा खरोखरच तिच्यासाठी भावनिक आणि अभिमानाचा क्षण होता. व्हिडिओमध्ये, प्रियंका तिचे अश्रू पुसताना दिसली.

Nick Jonas Video Viral: लाईव्ह परफॉर्मन्स दरम्यान स्टेजवर कोसळला प्रियंकाचा नवरा निक जोनस! पुढं काय घडलं पहा
Zareen Khan: सलमान खानची हिरोईन झरीन खान हॉस्पीटलमध्ये दाखल, समोर आलं मोठं कारण

जोनस ब्रदर्सच्या हे सध्या संपूर्ण कुटुंबासोबत वर्ल्ड टूरवर आहेत. प्रियांका चोप्रा, तिची मुलगी मालती मेरी, सोफी टर्नरपासून ते निकचे आई-वडील आणि भावाची पत्नीही या दौऱ्यावर आहेत.

जोनस ब्रदर्सने टूर दरम्यान त्यांचे पालक, डेनिस आणि केविन जोनस यांच्या लग्नाचा वाढदिवस देखील साजरा केला. निक आणि प्रियांकाने 2018 साली लग्न केले होते. 2022 मध्ये सरोगसीद्वारे त्यांची मुलगी मालती मेरीचा जन्म झाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com