Nikki tamboli trolls for Wearing Bhagwa Bikini after Shah Rukh Khan Deepika : टीव्ही मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री निक्की तांबोळी ही नेहमीच तिच्या बोल्डनेसमुळे चर्चेत आली आहे. तिचा चाहतावर्ग मोठा आहे. तिला फॉलो करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. आता निक्की एका वेगळ्याच कारणामुळे वादाचे कारण ठरताना दिसत आहे.
यंदाच्या वर्षी जानेवारीमध्ये किंग खानचा पठाण नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. तो एका कारणामुळे खूपच चर्चेत आला होता. त्याचे एक महत्वाचे कारण म्हणजे दीपिकाच्या भगव्या रंगाच्या बिकीनीवरुन खूपच मोठा वाद झाला होता. काही धार्मिक संघटनांनी त्यावरुन आक्रमक पवित्राही घेतल्याचे दिसून आले होते. यासगळ्यात वेगवेगळ्या थिएटर्समध्ये पठाणचे शो बंद पाडण्याचा प्रकार दिसून आला होता.
आता टीव्ही मनोरंजन क्षेत्रातील निक्की ही देखील वादाचे कारण ठरत आहे. तिचा भगवा रंगाची बिकीनी परिधान केलेला व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यावर तिला मिळालेल्या प्रतिक्रियाही भलत्याच तिखट आहे. यावरुन काही नेटकऱ्यांनी या व्हिडिओवरुन काही धार्मिक प्रश्न देखील उपस्थित केल्याचे दिसून आले आहे. विरल भयानीनं तो व्हिडिओ व्हायरल केला आहे.
यापूर्वी देखील निक्की तिच्या वेगवेगळ्या कारणांमुळे नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियेचा विषय झाल्याचे दिसून आले आहे. भगवा रंग हा आता वादाचे कारण ठरतो आहे.त्यामुळेच की काय त्यावरुन कित्येक बॉलीवूडच्या सेलिब्रेटींनी विविध प्रतिक्रिया देत नाराजी व्यक्त केली होती. आपण कशालाही भावनिक स्वरुप देत त्यावरुन वाद तयार करतो असा सूर सेलिब्रेटींनी आळवला होता.
निक्कीला नेटकऱ्यांनी ज्या प्रतिक्रिया दिल्या आहेत त्यातून तिच्यावर परखड शब्दांत निशाणा साधण्यात आला आहे. अशा रंगाची बिकीनी परिधान करुन तुला काय सांगायचे आहे हे जरा कळू शकेल का असा प्रश्न नेटकऱ्यांनी तिला केला आहे. काहींनी तिच्या सौंदर्याचे कौतुकही केले आहे. निक्की नेहमीप्रमाणे सुंदर दिसत असल्याची भावना त्या नेटकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.