Nilu Phule Death Anniversary : रेल्वेत सेकंड क्लासच्या डब्ब्यात साक्षात निळू फुले चढतात तेव्हा...

मराठी, हिंदी चित्रपट आणि नाट्यक्षेत्रामध्ये ज्यांच्या अभिनयाचे नेहमी धडे दिले जातात त्या निळु फुले यांचे चित्रपटसृष्टीला (Marathi movie news) मोठे योगदान आहे.
Nilu Phule death anniversary
Nilu Phule death anniversaryesakal
Updated on

Nilu Phule death anniversary : मराठी, हिंदी चित्रपट आणि नाट्यक्षेत्रामध्ये ज्यांच्या अभिनयाचे नेहमी धडे दिले जातात त्या निळु फुले यांचे चित्रपटसृष्टीला (Marathi movie news) मोठे योगदान आहे. एक अभिनेता म्हणून त्यांची लोकप्रियता तर मोठी होतीच. याशिवाय एक माणूस, सामाजिक कार्यकर्ता म्हणूनही त्यांनी अनेकांच्या हदयात स्थान मिळवले होते.

आज त्यांच्या (social worker nilu phule) पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण निळु फुले यांच्या विषयीच्या वेगवेगळ्या गोष्टी जाणून घेणार आहोत. निळु भाऊंच्या वाट्याला जेवढी लोकप्रियता आली तेवढी क्वचितच एखाद्या अभिनेत्याच्या वाट्याला आली असेल. आपण जसे आहोत तसे शेवटपर्यत राहून लोकांशी संवाद साधण्याचे काम त्यांनी अखेरच्या श्वासापर्यत केले.

निळुभाऊ हे अभिनेत्याबरोबर सामाजिक कार्यकर्ते देखील होते. आभाळाला हात लागलेले असताना देखील पाय सदैव जमिनीवर असणाऱ्या व्यक्तिमत्वांपैकी एक म्हणून त्यांच्या व्यक्तिमत्वाचा आवर्जुन उल्लेख करता येईल. त्यांच्या चित्रपटांना मिळणारा प्रतिसाद, त्यावरुन व्हायरल होणारे मीम्स हे सर्वकाही निळुभाऊंची आठवण करुन देणारे आहे. निळुभाऊंचे वेगवेगळे किस्से प्रसिद्ध आहे.

दिवंगत सामाजिक कार्यकर्ते आणि अंनिसचे प्रमुख डॉ.नरेंद्र दाभोलकर यांनी त्यांच्या एका लेखामध्ये निळु भाऊंच्या आठवणींना उजाळा दिला होता. त्यात त्यांनी म्हटले होते की, परिवर्तनाच्या चळवळीला एक पैसादेखील न घेता मदत करणे, ही निळूभाऊंची खास ओळख होती. मात्र चळवळीतील फाटकेपणा सहन करताना देखील स्वत:चा बडेजाव त्यांनी चुकूनही उच्चारला नाही. माझ्या स्मरणात एक आठवण पक्की आहे.

मी आणि निळूभाऊ अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या दौऱ्यासाठी जळगावला गेलो होतो. निवासव्यवस्था अल्प खर्चात व्हावी म्हणून कार्यकर्त्यांनी शासकीय विश्रामधाममधील खोली घेतली होती. शासकीय व्यवस्थापनात जो भोंगळपणा असतो, तो होताच. रात्री झोपून सकाळी धुळ्याकडे निघायचे होते. मी रात्री लवकर ताणून दिली.

चाहत्यांसोबत रंगलेल्या गप्पांच्या फडातून खोलीवर परतण्यास निळूभाऊंना रात्र झाली. सकाळी लवकरच निघायचे होते. मी साडेपाचला उठलो. बघतो तर निळूभाऊ कॉटवर हताशपणे डास मारत बसलेले. मग माझ्या लक्षात आले की, माझ्या कॉटला मच्छरदाणी होती; निळूभाऊंच्या कॉटला ती नव्हती. व्यवस्थापनाला त्याची फिकीर नव्हती. गहाळपणाने माझ्याही ते लक्षात आले नाही. डास तर भरपूरच होते. निळूभाऊंनी डास मारत रात्र काढली. ना मला उठवले, ना कोणा शिपायाला हाक मारली; मग आरडाओरडा तर दूरच. धुळे जिल्ह्याचा धावता दौरा करून त्या दिवशी रात्री ८ वाजता आम्ही चाळीसगावला पोहोचलो.

निळूभाऊंचे वातानुकूलित टू टायरचे तिकीट काढण्यास कार्यकर्त्यांना कळवले होते. ते मिळाले नाही, म्हणून कार्यकर्त्यांनी दुसऱ्या वर्गाचे तिकीट काढले होते. तोही गैरसोईचा साईड अप्पर बर्थ मिळाला होता. चाळीसगाव ते मनमाड महाराष्ट्र एक्स्प्रेसला जाताना अप-डाऊन करणाऱ्या रेल्वे प्रवाशांची खूप गर्दी असते. ते आरक्षित डब्यांत राजरोसपणे बसतात, पुढे मनमाडला उतरतात. हा नेहमीचा प्रघात असल्यामुळे तिकीट चेकर काही बोलत नाही. त्यामुळे आरक्षित डब्यातही चाळीसगाव ते मनमाड या प्रवासात धक्काबुक्की करत गर्दी सोसत जावे लागते. त्या दिवशीही महाराष्ट्र एक्स्प्रेसचा तो डबा गच्च भरलेला होता. त्यात निळूभाऊंना ढकलावे लागले.

Nilu Phule death anniversary
अभिनेते विद्याधर जोशी आणि अतुल काळे यांच्यात भांडण.. 'हे' कारण आलं समोर..

प्रवासी असल्या गर्दीत निळूभाऊ चढलेले पाहून चक्रावलेच. शूटिंग आहे, असा त्यांना संशय आला. निळूभाऊ स्थितप्रज्ञ वृत्तीने बाजूच्या वरच्या बर्थवर चढले आणि पांघरूण अंगावर ओढून झोपेच्या अधीन झाले. असे वागणे फक्त आणि फक्त निळूभाऊ यांनाच जमू शकते.

Nilu Phule death anniversary
धनुषचे हाॅलीवूडमध्ये पदार्पण, चित्रपट 'द ग्रे मॅन'चे होतेय कौतूक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.