सध्या मनोरंजन विश्वात नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर (NMACC) च्या उद्घाटन कार्यक्रमाची जोरदार चर्चा सुरु आहे. या कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी केवळ बॉलिवूडच नाही तर हॉलिवूडचे प्रसिद्ध स्टार्सही सहभागी झाले होते.
यादरम्यान शाहरुख खान, रणवीर सिंग, प्रियांका चोप्रा, आलिया भट्ट, रश्मिका मंदान्ना ते वरुण धवन यांच्यासह सर्व स्टार्सनीही डान्स परफॉर्मन्स दिला.
त्याच्या डान्सचे व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. त्यात शाहरुखचा पठाण आणि आलिया- रश्मिकाचा नाटू नाटू गाण्यावरचा डान्स नेटकऱ्यांना खुप आवडला. मात्र याबरोबरच वरुण धवनच्या डान्सची सर्वात जास्त चर्चा रंगली.
वरुण धवनच्या डान्सबाबत सोशल मीडियावर त्याला वाईटरित्या ट्रोल केलं जावु लागलं. वास्तविक त्याने हॉलिवूड अभिनेत्री गिगी हदीदसोबत डान्स केला.
वरुण धवनने अमेरिकन मॉडेल गिगी हदीदसोबत सुंदर डान्स परफॉर्मन्स दिला. त्याने हॉलिवूड मॉडेलला अयोग्यरित्या स्पर्श केला आणि तिला किस केल्याचा आरोप करत वरुणला ट्रोल करण्यात येत होत.
त्याचा व्हिडिओही इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.तो डान्स पाहिल्यानंतर नेटकरी अभिनेत्याबद्दल वाईट बोलू लागले. हे वाचून वरुण धवन चांगलाच संतापला आणि त्याने प्रतिक्रिया दिली.
वरुण धवनने ट्विट केलं आणि त्यात म्हटलं आहे की, " मला वाटत आज तुम्ही सकाळी उठलेच त्यामनाने होते. तर मी तुमच्या मनातला हा बुडबुडा फोडतो सांगतो की ते आधीच नियोजित होतं. स्टेजवर जे काही घडलं, ते सगळं आधीपासून ठरलेलं होतं. त्यामुळे याला मुद्दा बनवण्याऐवजी, ट्विटरवर दुसरा काही मुद्दा शोधा. शुभ सकाळ."
सोशल मिडियावर होत असलेल्या ट्रोलिंगमुळे वरुणने हे स्पष्टीकरण देत तो डान्स आधीपासूनच ठरलेला होता हे स्पष्ट केलं आणि ट्रोर्लसची बोलतीच बंद केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.