Nitin Desai Death: नितिन देसाईच्या जाण्यानं अक्षय कुमार धक्क्यात! घेतला मोठा निर्णय

आज म्हणजेच 2 ऑगस्टला OMG 2 चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. मात्र त्यापुर्वीच नितीन देसाई यांच्या निधनाची बातमी समोर आली. त्यामुळे अक्षयने ट्विट शेयर करत आज तो चिपटाचा ट्रेलर रिलिज करणार नसल्यांच सांगितलं.
 Akshay Kumar On Nitin Desai Suicide:
Akshay Kumar On Nitin Desai Suicide: Esakal
Updated on

Akshay Kumar On Nitin Desai Suicide: प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. बॉलिवूडसह मराठी मनोरंजन विश्वावरही त्याच्या जाण्याने शोककळा पसरली आहे. नितीन देसाई यांचा मृतदेह त्यांच्या एनडी स्टुडिओतच पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. नितीन चंद्रकांत देसाई यांच्या निधनानं बॉलीवूडमध्ये मोठी खळबळ उडाली आहे

 Akshay Kumar On Nitin Desai Suicide:
Nitin Chandrakant Desai Death : बॉडीगार्ड बराचवेळ दार वाजवत उभा होता, खिडकीतून खोलीतील पंखा पाहिला अन्...

त्यांच्या निधनाने सर्व सिनेतारकांनी पोस्ट शेयर करत त्यांनी शोक व्यक्त केला आहे. आता अक्षय कुमारने याने देखील नितिन देसाई यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्याने ओह माय गॉड 2 या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज पुढे ढकलली आहे.

आज म्हणजेच 2 ऑगस्टला OMG 2 चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. मात्र त्यापुर्वीच नितीन देसाई यांच्या निधनाची बातमी समोर आली. त्यामुळे अक्षयने ट्विट शेयर करत आज तो चिपटाचा ट्रेलर रिलिज करणार नसल्यांच सांगितलं.

 Akshay Kumar On Nitin Desai Suicide:
Ranveer Singh Grandfather: शेवटी ते रणवीरचेच आजोबा, झुमका गिरा रे वाजलं, बाबा थिरकले!

अक्षय कुमारने ट्विट शेयर करत चाहत्यांना ही माहिती दिली. तो त्याच्या पोस्टमध्ये लिहितो की, "माझा यावर विश्वास बसत नाही आणि नितीन देसाई यांच्या जाण्याने मी खुप दु:खी आहे.

नितीन देसाई हे प्रॉडक्शन डिझाईनचे दिग्गज होते. ते सिनेविश्वाचा एक मोठा भाग होते. त्याच्या जाण्याने इंडस्ट्रीचे खुप मोठे नुकसान झाले आहे.

त्यांच्या सन्मानार्थ आम्ही आज OMG 2 चा ट्रेलर रिलीज करत नाही आहोत. उद्या सकाळी 11 वाजता आम्ही ट्रेलर लॉन्च करू. ओम शांती."

 Akshay Kumar On Nitin Desai Suicide:
Dream Girl 2 Trailer: मांग भरने के लिए पुरा मोहल्ला पडा है, लेकिन बिल भरने... ड्रीम गर्ल २ ट्रेलर हसून करेल वेडं

रायगड पोलीस आता नितीन देसाईच्या तपासात गुंतले आहेत. पोलिसांना त्याच्या फोनमधून एक ऑडिओ क्लिप मिळाल्याचे ज्यात त्यांनी चार जणांची नावे सांगितले आहेत असं सांगितलं जात आहे. त्याचबरोबर त्याच्यावर कर्ज असल्याचेही बोलले जात आहे.

नितीन देसाई यांच्या पार्थिवावर उद्या म्हणजेच 2 ऑगस्ट संध्याकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. तोपर्यंत त्याचा मृतदेह मुलुंडमधील एका रुग्णालयाच्या शवाघरात ठेवण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.