Nitin Chandrakant Desai Death Case: बॉलिवूडचे सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्येने सर्वांनाच धक्का बसला आहे. नितीन देसाई यांनी बुधवारी कर्जतमधील त्यांच्या एन. डी. स्टुडिओमध्ये आत्महत्या केली. या घटनेमुळे चित्रपटसृष्टी बरोबरच राजकिय क्षेत्रातही खळबळ उडाली. आता पर्यंत या प्रकरणात अनेक खुलासे समोर आले आहेत.
नितिन यांनी आत्महत्या करण्यापूर्वी काही व्हॉइस क्लिप रेकॉर्ड केल्या होत्या. त्यामधून अनेक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. कर्जाच्या वसुलीसाठी तगादा लावणाऱ्या चार पाच अधिकाऱ्यांची नावं त्यांनी यात घेतली आहे.
या ऑडिओ क्लिपच्या आधारे पोलिस आत्महत्येमागील गूढ उकलण्याचा प्रयत्न करत आहेत. रायगड पोलिसांना नितीन देसाई यांच्या फोनमधून 11 ऑडिओ क्लिप मिळाल्या आहेत ज्यात अनेक प्रश्नाची उत्तर सापडणार असल्याची शक्यता आहे.
आता या प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ते ऑडिओ फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. तर समोर आलेल्या माहिती नुसार नितीन देसाई हे लॉबिंगचे शिकार झाल्यांचं बोललं जात आहे.
ऑडिओ क्लिपमध्ये एकूण चार जणांची नावं समोर आली आहेत. त्यात एडलवाईस कंपनीलाही मृत्यूसाठी जबाबदार धरण्यात आले आहे. तर ऑडिओमध्ये ज्या चार लोकांबद्दल बोललं जातं आहे. त्यात एका अभिनेत्याचंही नाव असल्याच्या बातम्या आता समोर आल्या आहेत.
या ऑडिओ क्लिपमध्ये नितीन देसाईंच्या एनडी स्टुडिओला बॉयकॉट करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. नितीन देसाई यांच्या स्टुडिओला बॉलिवूडच्या एका मोठ्या गटानं बॉयकॉट केल्याचं सांगितलं जात आहे.
या मोठ्या गटात अनेक मोठमोठ्या कलाकारांची नावं समोर आली आहेत. मात्र, या क्लिपसोबत काही छेडछाड करण्यात आली आहे का, याची सध्या फॉरेन्सिक तपासणी केली जात आहे.
नितीन देसाई यांच्यावर असलेले कर्ज आणि खराब आर्थिक परिस्थिती यामुळे त्यांनी आत्महत्या केली अशा चर्चा होत्या. मात्र आता या ऑडिओ क्लिपमुळे अनेक धक्कादायक आणि नवे खुलासे झाले असून आता मात्र आता नितीन देसाई हे लॉबिंगचे बळी ठरल्याचं वृत्तांमध्ये सांगण्यात येत आहे.
शवविच्छेदन अहवालामध्ये नितीन देसाई यांनी गळफास घेतला आल्याचे निष्पन्न झालं असून आज सकाळी नितीन देसाई यांचा मृतदेह अंत्यदर्शनासाठी एनडी स्टुडिओमध्ये ठेवण्यात आला आहे. आज संध्याकाळी त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.