Nitin Desai Death: कोकणातलं निसर्गरम्य बालपण त्यांच्यातला जागतिक दर्जाचा कलाकार घडवून गेलं

Nitin Desai Death:
Nitin Desai Death: Esakal
Updated on

Nitin Desai Latest Update : लोकप्रिय भारतीय कला दिग्दर्शक आणि प्रॉडक्शन डिझायनर नितीन चंद्रकांत देसाई यांनी त्याच्या एडी टिव्ही स्टूडियोमध्ये गळफास घेवुन आत्महत्या केली. त्यांच्या जाण्याने मनोरंजन विश्वाला धक्काच बसला आहे. देसाई यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र त्यांच्या जाण्यानं बॉलीवूडला मोठा धक्का बसला आहे. सध्या घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. पुढील तपास सुरु आहे.

नितीन देसाई यांची कारकिर्द खुप भव्य आहे त्यांनी अनेक मराठी हिंदी सिनेमे चित्रपट सृष्टीला दिले. नितीन देसाई यांचा जन्म दापोली येथे 9 ऑगस्ट 1965 रोजी झाला. बी.डी.डी. चाळीत जन्मलेल्या नितीन यांनी पाचवलीसारख्या कोकणातील खेडेगावाच्या मातीशी नाळ जुळलेली होती. ते एक उत्कृष्ठ मराठी चित्रपट-कलादिग्दर्शक, चित्रपट दिग्दर्शक व निर्माते होते ज्यांनी हिंदी, मराठी चित्रपटांसाठी कलादिग्दर्शन केले.

Nitin Desai Death:
Nitin Desai Death : प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांची आत्महत्या

देसाई यांचे शालेय शिक्षण येथील मुलुंड वामनराव मुरंजन हायस्कूलमध्ये मराठी माध्यमात केले होते. चित्रपटात विश्वात येण्यापूर्वी त्यांनी मुंबईतील जेजे स्कूल ऑफ आर्ट आणि एलएस रहेजा स्कूल ऑफ आर्ट्समध्ये फोटोग्राफीचे शिक्षण घेतले.

Nitin Desai Death:
Kangana Ranaut : 'तो जाम भारीये, त्याची अन् माझी जोडी कशी वाटेल', कंगनाच्या मनात आहे तरी कोण?

सनम (1999), लगान (2001), देवदास (2002), जोधा अकबर (2008) आणि प्रेम रतन धन पायो (2015), ‘परिंदा’, ‘1942: अ लव्ह स्टोरी’, ‘आ गले लग जा’, ‘सलाम बॉम्बे’, अशा सुपरहिट चित्रपटांसाठी ते ओळखले जायचे. त्यांनी आशुतोष गोवारीकर, विधू विनोद चोप्रा, राजकुमार हिरानी आणि संजय लीला भन्साळी यांसारख्या बड्या दिग्दर्शकांसोबत काम केले आहे.

मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत त्यांनी उत्तम कामगिरी केली. ‘हम दिल दे चुके सनम’ आणि ‘देवदास’साठी या चित्रपटांसाठी त्यांना उत्कृष्ट कला दिग्दर्शक म्हणून राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ या सिनेमासाठी त्यांनी उत्कृष्ट कला दिग्दर्शक म्हणुन ‘महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

Nitin Desai Death:
Puneet Singh Rajput : प्रसिद्ध अभिनेता पुनीत सिंगच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल, अभिनेत्रीची तक्रार

त्यांना चार वेळा सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शनासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता. त्यांना तीन वेळा सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शनाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे.

2005 मध्ये त्यांनी मुंबईजवळील कर्जत येथे 52 एकरात भव्य असा एनडी स्टुडिओ उघडला, ज्यात त्यांनी जोधा अकबर, ट्रॅफिक सिग्नल आणि कलर्सचा रिअॅलिटी शो बिग बॉस यासारखे होस्ट केले गेले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.