Nitin Desai Bollywood Art Director Passed Away : लगान, जोधा अकबर, हम दिल दे चुके सनम, यासारख्या कित्येक चित्रपटांना आपल्या कलादिग्दर्शनाचा साज चढवून प्रसिद्ध झालेल्या नितीन देसाई यांच्याबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. देसाई यांनी त्यांच्या एन डी स्टुडिओमध्ये आत्महत्या केल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे.
देसाई यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र त्यांच्या जाण्यानं बॉलीवूडला मोठा धक्का बसला आहे. सध्या घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. गेल्या तीन दशकांपासून देसाई यांनी आपल्या कला दिग्दर्शनानं चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले होते. '1942 अ लव स्टोरी' या चित्रपटानं त्यांच्या करिअऱची सुरुवात केली होती.
कर्जत मध्ये देसाई यांचा स्टुडिओ होता. तो त्याच्या भव्यतेसाठी प्रसिद्ध होता. आता त्या स्टुडिओमध्ये त्यांनी आत्महत्या केल्यानं अनेकांना मोठा धक्का बसला आहे. केवळ हिंदीच नाहीतर मराठी आणि इतर भाषांमधील चित्रपटांचे देसाई यांनी कलादिग्दर्शन केले होते.
नितीन देसाई यांच्या चित्रपटाविषयी सांगायचे झाल्यास त्यांनी 1942 अ लव्ह स्टोरी, हम दिल दे चुके सनम, माचिस, देवदास, लगान, जोधा अकबर या चित्रपटांचे कला दिग्दर्शन केलं होतं. नितीन देसाई हे मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतलं मोठं नाव होतं. त्यांचे जाणे हे बॉलीवूड, मराठी चित्रपट नाट्य क्षेत्रातील अनेकांना चटका लावून जाणारे आहे.
बॉलीवूडमध्ये नितीन चंद्रकांत देसाई यांच्या नावाचा वेगळा दरारा होता. शून्यातून सुरुवात करत एका मराठमोळ्या माणसानं स्वताच्या क्षमतांवर एवढी मोठी मोठी ओळख निर्माण केली. त्यांचा हा प्रवास काही सोपा नव्हता. एनडी स्टुडिओची केवळ बॉलीवूडच नाही तर हॉलीवूडमध्ये देखील मोठी क्रेझ होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.