Nitin Desai: नितीन देसाईंच्या मृत्युसंबंधी आरोपांवर एडलवाईस कंपनीचं स्पष्टीकरण; म्हणाले, सर्वच बाजुने...

नितीन देसाईंनी ज्या एडलवाईस कंपनीवर आरोप केला. त्या कंपनीने त्यांचं स्पष्टीकरण दिलंय
nitin desai death case Edelweiss company official statement on allegations
nitin desai death case Edelweiss company official statement on allegationsSAKAL
Updated on

Nitin Desai Case Update: कलादिग्दर्शक नितीन देसाई यांची आत्महत्या केल्याने सर्वांना धक्का बसला. नितीन देसाईंनी यांनी आजवर अनेक सिनेमांसाठी कलादिग्दर्शक म्हणुन काम केलंय. नितीन देसाईंनी मृत्युआधी त्यांच्या ऑडीओ क्लिपमध्ये एडलवाईस कंपनीवर मानसिक छळाचा आरोप केला.

नितीन देसाईंनी ज्या एडलवाईस कंपनीवर आरोप केला. त्या कंपनीने त्यांचं स्पष्टीकरण दिलंय. या स्पष्टीकरणात सगळ्या बाजुंची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केलीय.

(nitin desai death case Edelweiss company official statement on allegations)

nitin desai death case Edelweiss company official statement on allegations
Kailas Nath Death: लोकप्रिय अभिनेता कैलास नाथ यांचं निधन, वयाच्या ६५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

एडलवाईस कंपनीचं स्पष्टीकरण

एडलवाईस अॅसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीने (EARC) गुरुवारी प्रख्यात कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या मृत्यूची चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

गेल्या आठवड्यात देसाई यांची कंपनी N D Art World विरुद्ध दिवाळखोरीची कारवाई यशस्वीपणे सुरू केलेल्या वित्तीय सेवा कंपनीने सांगितले की, ते कायदेशीर प्रक्रियेसाठी वचनबद्ध आहेत.

"आम्ही सर्व संबंधित अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य करण्यास वचनबद्ध आहोत. पारदर्शकता, कायदेशीर प्रक्रियेचे पालन करण्याची आमची वचनबद्धता कायम आहे," असे EARC ने एका निवेदनात म्हटले आहे.

NCLT ने अपील फेटाळला

सत्ताधारी भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी EARC आणि समूहाचे अध्यक्ष रशेष शहा यांची नावे घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सखोल चौकशीची घोषणा केली. यानंतर काही तासांतच कंपनीशी संवाद झाला.

संध्याकाळी उशिरा दिलेल्या निवेदनात, EARC ने खटल्यातील घटनाक्रमांची यादी केली आणि सांगितले, की देसाई यांना राष्ट्रीय कंपनी अपील न्यायाधिकरणाकडूनही (NCLT) दिलासा मिळू शकला नाही. 1 ऑगस्ट रोजी ND च्या आर्ट वर्ल्डचे अपील त्यांनी फेटाळली.

याशिवाय NCLT ने जितेंद्र कोठारी यांची चौकशीसाठी नियुक्ती केली होती. या निर्णयाविरोधात N D's Art कंपनीने NCLT च्या दिल्लीतील खंडपीठाकडे अपील केले. मात्र, १ ऑगस्ट रोजी दिल्लीच्या खंडपीठाने देसाई यांचे अपील फेटाळून लावले, अशी माहिती पत्रकात नमूद करण्यात आली आहे.

nitin desai death case Edelweiss company official statement on allegations
Aaliyah Kashyap Engagement: अनुराग कश्यपची लेक आलियाने हिंदु रितीरिवाजानुसार मुंबईत केला साखरपुडा

नितीन देसाईंनी कर्ज घेतले अन् परतफेडीचा त्रास सुरु

ND's Art World Pvt Ltd ने 2016 आणि 2018 मध्ये ECL फायनान्स म्हणजेच Edelweiss समूहाची शाखा असलेल्या दोन कर्जांद्वारे 185 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते.

पण पुढे जानेवारी 2020 मध्ये त्यांना परतफेडीचा त्रास सुरू झाला. जून 2022 पर्यंत जमा झालेल्या व्याजासह हे कर्ज 252 रु. कोटी इतके झाली.

नितीन देसाईंचं अंत्यसंस्कार स्टुडीओतच होणार

नितीन देसाईंनी ऑडीओ क्लिपमध्ये N D Studio बद्दल प्रेम दर्शवलं आहे. नितीन देसाई ऑडीओ क्लिपमध्ये म्हणतात.. माझ्यापासुन N D Studio कधीही दूर करु नका. माझे अंत्यसंस्कार सुद्धा N D Studio व्हावेत अशी माझी इच्छा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.