Nitin Desai Death: '1942 अ लव्ह स्टोरी', 'हम दिल दे चुके सनम', 'माचिस', 'देवदास', 'लगान', 'जोधा अकबर' या सुपरहिट सिनेमाचं त्यांनी कला दिग्दर्शन करणारे नितिन देसाई हे मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतलं मोठं नाव होतं. वयाच्या 58 व्या वर्षी कर्जतमधील एनडी स्टुडीओमध्ये त्यांनी गळफास घेत आयुष्य संपवलं आहे.
माहितीनुसार, नितीन देसाई यांचा मृतदेह एनडी स्टुडिओमध्ये लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. नितीन देसाई यांनी करोडो रुपयांचे भव्य मेगा बजेट चित्रपट आणि टीव्ही मालिकांचे सेट बनवले होते.
त्यांनी केवळ चित्रपट मालिकाचं नव्हे तर अनेक राजकिय नेत्यांच्या भाषण मेळाव्याचे सेटही त्यांनी उभारले होते. यासोबतच दरवर्षीही ते सेवा म्हणून मुंबईतील प्रसिद्ध गणपती मंडप 'लालबाग चा राजा' चा सेट बनवायचे. यंदा त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी सेट बनवायचा होता.
नव्वदाव्या वर्षीचं मंडप पूजन आणि सजावट देखील नितीन देसाई हेच करत होते. त्याचे फोटो त्यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट केले होते.
मागच्या वर्षी त्यांनी 'लालबाग चा राजा' येथे राममंदिराचा देखावा उभारला होता. तर यंदा त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा देखावा ते करणार होते. त्यासाठी सेट बनवण्यास सुरुवातही केली होती. नितीन देसाई यांना त्यांच्या कलेतून हा सोहळा पुन्हा एकदा प्रेक्षकांना दाखवायचा होता.
'लालबाग चा राजा'च्या सेटबद्दल बोलताना नितीन देसाई यांनी सांगितले होते की, मी जेव्हाही बाप्पाची सेवा करतो तेव्हा वर्षभर आधीच त्यावर विचार करायला सुरुवात करतो. तो सेट बनवायला मला सहा महिने लागतात. लालबागच्या राजाच्या सेटच्या माध्यमातून मीही माझ्या कलेच्या विचारांची नव्याने सुरुवात करतो. म्हणूनच मला त्यावर 365 दिवस चिंतन करायला आवडतं. दरवर्षी दिसणारा हा भव्य 'लालबाग चा राजा' चा सेट हे त्याच्या मेहनतीचे फळ आहे.
गणपतीच्या आगमनाला अवघे ४५ दिवस उरले असतांना त्याच्या निधनाने आता हे काम अपुर्ण राहिलं आहे. अशा परिस्थितीत यंदा ते काम कोण आणि कसं पूर्ण होणार असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
नितीन चंद्रकांत देसाई यांनी आत्महत्या सारखं इतकं टोकाचं पाऊल का उचललं? याबाबत पोलीस शोध घेत आहेत. त्यांच्या मृत्यूमागे आर्थिक कारण असल्याचा संशय़ व्यक्त करण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.