Money Laundering Case: नोरा फतेही 200 कोटी मनी लॉंड्रिंग प्रकरणी न्यायालयात हजर

या प्रकरणी अभिनेत्रीची अनेकदा चौकशी करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांच्या चौकशीदरम्यान नोराने अनेक गोष्टींचा खुलासा केला.
Nora Fatehi
Nora FatehiSakal
Updated on

सुकेश चंद्रशेखरशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात नोरा फतेहीच्या अडचणी कमी होण्याचे नाव घेत नाहीत. या प्रकरणी अभिनेत्रीची अनेकदा चौकशी करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांच्या चौकशीदरम्यान नोराने अनेक गोष्टींचा खुलासा केला. मात्र या प्रकरणी अभिनेत्रीला वारंवार आपले म्हणणे मांडावे लागत आहे. या प्रकरणी तिचे म्हणणे नोंदवण्यासाठी ती पुन्हा दिल्लीत आली होती. दिल्लीतील पटियाला हाऊस कोर्टात तिची जबानी नोंदवण्यात आली.

सुकेश चंद्रशेखर 200 कोटी रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी नोरा फतेहीची चौकशी सुरू आहे. खरं तर, नोरा फतेही आणि जॅकलिन फर्नांडिससह अनेक बड्या बॉलिवूड अभिनेत्री सुकेशच्या तावडीत अडकल्या होत्या. या प्रकरणात नोराला सरकारी साक्षीदार करण्यात आले आहे. अभिनेत्री आता पुन्हा दिल्लीत तिची जबानी नोंदवण्यासाठी आली आहे.

Nora Fatehi
Aishwarya Narkar Video : पन्नाशी ओलांडली तरी ऐश्वर्या नारकर म्हणते, 'पतली कमरिया मोरी...'

नोराचे निवेदन मनी लाँडरिंग कायदा 2002 च्या कलम 50(2) आणि 50(3) अंतर्गत नोंदवले गेले होते. या प्रकरणी अभिनेत्रीने तिच्यावर लावण्यात आलेले आरोप फेटाळून लावले होते. त्यानुसार सुकेशने तिला आपल्या जाळ्यात अडकविण्याचा प्रयत्न केला. नोराला सुकेश चंद्रशेखर याची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री लीना मारिया पॉल यांनी चेन्नईतील एका खास कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी बोलावले होते.

सुकेश चंद्रशेखर प्रकरणाबाबत बोलायचे झाले तर या प्रकरणी दिल्लीत पहिली एफआयआर नोंदवण्यात आली होती, त्यानंतर ईडीने या प्रकरणाचा तपास सुरू केला होता. या तपासात असे आढळून आले की सुकेश चंद्रशेखरने गृह मंत्रालयाच्या वतीने फोन करून रॅनबॅक्सीचे माजी प्रवर्तक शिविंदर सिंग यांची पत्नी अदिती सिंग हिला आपल्या जाळ्यात अडकवून २०० कोटी हडप केले.

या प्रकरणात हळूहळू अनेक बॉलीवूड अभिनेत्रींची नावे पुढे आली, त्यात जॅकलीन फर्नांडिसचेही नाव आहे. सुकेशचे जॅकलिनसोबतचे काही फोटोही समोर आले होते, ज्यानंतर अभिनेत्रीच्या अडचणी खूप वाढल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.