2023 ला निरोप देण्यासाठी सर्वजण सज्ज आहेत. या वर्षात 'अॅनिमल', जवान, पठाण, गदर 2 अशा अनेक सिनेमांनी बॉक्स ऑफीसवर बक्कळ कमाई केली. शाहरुख खानने या वर्षात जवान, पठाण, डंकी अशा तिन्ही सिनेमांमधून रेकॉर्डब्रेक कामगिरी केली.
या सिनेमांनी बॉक्स ऑफीस गाजवलं, यात काही शंका नाही. पण याव्यतिरिक्त २०२३ मध्ये असे अनेक वेगळ्या विषयांवरचे सिनेमे आले ज्यांनाही प्रेक्षकांनी पसंती दिली. चला तर पाहूयात 2023 मध्ये बॉलीवूडसाठी संस्मरणीय ठरणारे सिनेमे कोणते?
कार्तिक आर्यन स्टारर 'सत्यप्रेम की कथा' सिनेमा अनपेक्षितपणे बॉक्स ऑफीसवर हिट झाला. सिनेमाची हृदयस्पर्शी कथा आणि कार्तिक आर्यनने साकारलेल्या सत्तू या पात्राला तुफान प्रसिद्धी मिळाली.
मराठमोळा दिग्दर्शक समीर विद्वांसने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. कार्तिक आर्यन - कियारा अडवाणी यांनी प्रमुख भूमिका साकारली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जवळपास 117 कोटींची कमाई केली होती.
'12th Fail' मधील विक्रांत मॅसीच्या दमदार अभिनयाने आणि विधू विनोद चोप्रांच्या दिग्दर्शनाने या सिनेमाने चांगला नावलौकीक मिळवला. या चित्रपटाने प्रेक्षकांना भुरळ घातली. 27 ऑक्टोबरला रिलीज झालेल्या या चित्रपटाने जवळपास 62 कोटींची कमाई केली आहे.
एक नवीन दृष्टीकोन आणून गंभीर विषयाची मांडणी केल्याबद्दल 'द केरळ स्टोरी'ला प्रेक्षकांची पसंती मिळाली. सिनेमाने प्रभावीपणे सांस्कृतिक बारकावे प्रदर्शित केले. ५ मे रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने तिकीट खिडकीवर तब्बल ३१९.८ कोटींची कमाई केली. अदा शर्माने सिनेमात प्रमुख भूमिका साकारली होती.
Fukrey फ्रँचायझीने 'Fukrey 3' सोबत आपली विजयी मालिका सुरू ठेवली आहे. विनोद, मैत्री आणि मोहक कथेने परिपूर्ण असलेल्या या चित्रपटाने पुन्हा एकदा सुपरहिट कामगिरी केली.
पुलकित - वरुण या मुख्य जोडीची केमिस्ट्री आणि विनोदी टायमिंगने या चित्रपटाने चांगले यश मिळवले. 28 सप्टेंबर रोजी रिलीज झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जवळपास 128 कोटींची कमाई केली होती.
2019 च्या हिट चित्रपटाचा सिक्वेल, 'ड्रीम गर्ल 2' ने सुद्धा चांगलं यश मिळवलं. आयुष्मान खुरानाने पुजाची जबरदस्त भूमिका साकारुन प्रेक्षकांना खळखळून हसवले. ड्रीम गर्ल 2 24 ऑगस्ट रोजी रिलीज झाला आणि सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 102.7 कोटी कमावले.
अक्षय कुमारची प्रमुख भूमिका असलेला 'मिशन रानीगंज' सिनेमा सत्य घटनेवर आधारीत होता. या सिनेमा बॉक्स ऑफीसवर मात्र अपयशी ठरला. तरीही विद्यार्थ्यांना धैर्य, दृढनिश्चय आणि बचाव मोहिमेचे महत्त्व समजावून सांगण्यासाठी हा सिनेमा महत्वाचा मानला जातो. 6 ऑक्टोबर रोजी रिलीज झालेल्या या चित्रपटाने 33.14 कोटींची कमाई केली आहे.
विशेषत: कोविड 19 लॉकडाऊनच्या वेळी आलेल्या लसीकरण मोहीमेवर आधारीत 'द व्हॅक्सिन वॉर' सिनेमाने एक नवीन कथा प्रेक्षकांसमोर आणली. चित्रपटाने केवळ मनोरंजनच केले नाही, तर सामाजिक समस्येवर महत्त्वपूर्ण प्रकाश टाकला. नाना पाटेकरांची प्रमुख भूमिका असलेला हा सिनेमा 28 सप्टेंबर रोजी रिलीज झाला. या चित्रपटाने 9.47 कोटी रुपये कमवले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.