Bigg Boss 16 Grand Finale: बिग बॉस हिंदी १६ व्या सीझनच्या फायनलला आता काहीच दिवस राहिले आहेत. बिग बॉस मध्ये फिनाले विक सुरु झालाय. या रविवारी म्हणजेच १२ फेब्रुवारीला बिग बॉस १६ ची ग्रँड फिनाले रंगणार आहे. हिंदी आणि मराठी इंडस्ट्रीतील अनेक कलाकार त्यांच्या आवडत्या सदस्याला सपोर्ट करत आहेत.
मराठी इंडस्त्रातील बहुसंख्य कलाकार मराठमोळ्या शिव ठाकरेला सपोर्ट करताना दिसत आहेत. पण हृता मात्र शिव ठाकरेला सोडून वेगळ्याच सदस्याला फायनलसाठी सपोर्ट करतेय.
(not shiv thakare hruta durgule support this member for finale of bigg boss 16)
बिग बॉस हिंदीच्या ग्रँड फिनालेसाठी आता केवळ २ दिवस बाकी आहेत. वोटिंग लाईन्स वर आवडत्या सदस्याला वोट करण्यासाठी सर्वांनी कंबर कसली आहे. मराठी इंडस्ट्रीतले अनेक कलाकार सोशल मीडियाच्या माध्यमातून शिव ठाकरेला वोट करण्यासाठी अपील करत आहेत. अशातच हृता दुर्गुळे मात्र शिव ठाकरे नव्हे तर शालीन भानोतला सपोर्ट करताना दिसतेय
हृताने तिच्या इंस्टाग्राम स्टोरी वर शालीनचा एक व्हिडिओ शेयर केलाय. शालीन भानोत आता ट्रॉफी घरी घेऊनच ये असं कॅप्शन लिहून हृताने शालीनसाठी प्रेमाचा ईमोजी दिलाय. हृता मराठमोळ्या शिवला सोडून शालीनला सपोर्ट करत असल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
आता बिग बॉस १६ च्या ग्रँड फिनालेमध्ये कोण बाजी मारणार, आणि बिग बॉस १६ च्या ट्रॉफीवर कोण स्वतःचं नाव कोरणार, हे रविवारी १२ फेब्रुवारीला स्पष्ट होईल
रंगभूमी, मालिका अशा विविध माध्यमांमधून प्रेक्षकांच्या मनावर आपल्या अप्रतिम अभिनयाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री म्हणजे हृता दुर्गुळे. २०२२ ला हृताचे दोन सिनेमे रिलीज झाले ते म्हणजे अनन्या आणि टाईमपास ३.
हृताने दोन्ही सिनेमात कमालीच्या वेगळया भूमिका साकारल्या. मराठी सिनेसृष्टीत हृताची एंट्री काहीशी हटके झाली. हृताच्या दोन्ही सिनेमांचं कौतुक झालं.
याशिवाय वैयक्तिक आयुष्यात हृताने बॉयफ्रेंड प्रतीक शाह सोबत लग्न केलं. मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत थाटामाटात हृता लग्नबंधनात अडकली. १८ मे २०२२ ला हृता प्रतिक सोबत विवाहबंधनात अडकली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.