भारतीय जनता पार्टीच्या नेता नुपूर शर्मा(Nupur Sharma) यांनी पैगंबर मोहम्म्द यांच्यासंदर्भात वादग्रस्त(Controversy) विधान केलं आणि त्याचे पडसाद चक्क जगभरात उमटलेले दिसले. आखाती देशांनीही नुपुर शर्मांचा विरोध केला. देशात सर्वत्र नुपुर शर्मा यांच्या विरोधात आंदोलनं केली गेली. इतकंच नाही तर त्यांना जीवे मारण्याच्या,फासावर लटकवण्याच्या धमक्याही दिल्या गेल्या. याच प्रकरणावर काही क्रिकेटर्सही सोशल मीडियावर व्यक्त झाले. पण आता गौतम गंभीरनं(gautam Gambhir) नुपुर शर्मांची बाजू घेत केलेल्या ट्वीटमुळं(Tweet) स्वरा भास्करनं (Swara Bhaskar)त्याला फटकारलंय. चला जाणून घेऊया काय म्हणाला होता गौतम गंभीर आणि त्याला काय बोललीय स्वरा भास्कर.(Swara slams to Gautam Gambhir Over Nupur Sharma Controversy)
स्वरा भास्करनं गौतमं गंभीरच्या नुपुर शर्मा वरील 'धर्मनिरपेक्ष उदारमतवादी' प्रतिक्रियेविरोधात सूर काढत त्याला फटकारलं आहे. गौतम गंभीरनं नुपुर शर्मा वादात उडी मारत ट्वीट केलं होतं की,''ज्या महिलेनं माफी मागितल्यानंतही तिच्या विरोधात देशातील लोक जात आहे, सर्वत्र तिच्या विरोधात वातावरण दिसत आहे. इतकंच नाही तर लोक तिला फासावर लटकवण्याच्या भाषा करत आहेत. तिचे फासावर लटकलेले प्रतिकात्मक पुतळे लावत आहेत. तिला जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे. आणि हे सगळं सुरू असताना धर्मनिरपेक्ष उदारमतवादी म्हणवून घेणारे लोक गप्प बसले आहेत,हे सगळं मन सुन्न करणारं आहे''.
स्वरा भास्करनं गौतम गंभीरला या ट्वीट संदर्भात सुनावताना आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीत लिहिलं आहे की, ''इनको बुल्डोजर्स की आवाज नही सुनाई पड रही लेकीन...'' तिनं शुद्ध हिंदीतच ही प्रतिक्रिया दिली आहे. ही प्रतिक्रिया देत स्वरानं नुपुर शर्मांच्या वादग्रस्त विधानाचा विरोध करतानाच त्यांना समर्थन देणाऱ्या गौतम गंभीरचाही समाचार घेतला आहे. स्वरानं काही दिवसांपूर्वीच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट टाकली होती जी चर्चेत होती. ती म्हणाली होती,''आजकाल भारतात राहणे म्हणजे सतत एक राग डोक्यात घेऊन जगणं,जो असह्य होत आहे''.
स्वरा भास्करच्या सिनेमांविषयी बोलायचं झालं तर ती आपल्याला 'शीर-खुर्मा' मध्ये शबाना आझमी आणि दिव्या दत्ता यांच्यासोबत दिसली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.