Nushrratt Bharuccha: पॅलेस्टाईन आणि इस्रायलमध्ये युद्ध सुरू झाले आहे. पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमासने इस्राइलवर 5000 क्षेपणास्त्रे डागली आहेत, त्यानंतर दोन्ही देशांमध्ये युद्ध सुरू आहे.
दरम्यान, बॉलीवूड अभिनेत्री नुसरत भरुचा ही इस्राइलमध्ये अडकल्याची बातमी समोर आली होती. खुद्द नुसरतच्या टीमने याबाबत माहिती दिली होती आणि आता तिच्यासोबत संपर्क तुटल्याचेही सांगितले होते.
त्यानंतर तिचे चाहते काळजीत पडले होते. मात्र आता नुसरत भरुचा बाबात एक दिलासादायक बातमी समोर आली आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, इस्राइलमध्ये अडकलेल्या नुसरतशी वेळोवेळी संपर्क साधण्याचा पर्यंत केला जात होता. आता तिच्यासोबत संपर्क साधला गेला आहे. नुसरत आता पूर्णपणे सुरक्षित आहे. इस्राइलमधून बाहेर पडण्यासाठी ती विमानतळावर पोहोचली आहे.
अभिनेत्री लवकरच विमानाने इस्राइलमधुन रवाना होणार आहे. आता ही बातमी नुसरतचे कुटुंब, चाहत्यांसाठी एक दिलासादायक बातमी ठरणार आहे. आता सर्वजण नुसरतच्या सुखरूप मायदेशी परतण्याची वाट पाहत आहेत.
टीमने सांगितले की, 'आम्ही नुसरतशी संपर्क साधण्यात यशस्वी झालो आणि दूतावासाच्या मदतीने तिला सुरक्षितपणे घरी आणले जात आहे, आम्हाला थेट विमान सापडले नाही म्हणून ती कनेक्टिंग फ्लाइटने भारतात येतआहे. परंतु ती भारतात पोहोचताच आम्ही ती माहीती तुमच्याशी शेअर करू.'
यापुर्वी नुसरत इस्राइलमध्ये अडकल्याच्या वृत्ताला नुसरत भरुचाच्या टीमने दुजोरा दिला आहे. नुसरत भरुचा इस्राइलमध्ये असल्याचं तिच्या टिमने सांगितलं होतं. नुसरत हैफा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलसाठी इस्राइलला गेली होती.
रात्री 12.30 वाजता तिच्यासोबत संपर्क साधला गेला त्यावेळी ती सुरक्षित होती त्यानंतर तिच्यासोबतचा संपर्क तुटल्याने सर्व चिंतेत होते. आता ती परत येण्यासाठी ती भारताकडे रवाना झाली आहे.
नुसरत भरुचा नुकतीच 'अकेली' या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात तिने अशा मुलीची भुमिका साकरली होती जी कामासाठी इराकमध्ये जाते आणि इराकी युद्धात अडकते . त्यानंतर ती भारतात परतण्यासाठी खूप प्रयत्न करते.
या चित्रपटाची कथा तिच्या खऱ्या आयुष्यात येताना दिसत होती. त्यातच आता नुसरतने भारतात सुखरूप परतावे यासाठी सर्व चाहते प्रार्थना करत आहेत. आता ती लकरच भारतात पोहचणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.