Nushrratt Bharuccha on getting replaced by Ananya Panday in Dream Girl 2: बॉलिवूडमध्ये सध्या अक्षय कुमारच्या 'OMG2' आणि सनी देओलच्या 'गदर 2' ची चांगलीच हवा आहे. असं असलं तरी आणखी एक सिनेमा रिलिज होण्याच्या तयारीत आहे ज्याची प्रेक्षकही आतुरतेने वाट बघत आहे तो सिनेमा म्हणजे आयुष्मान खुराना 'ड्रीम गर्ल 2'.
या चित्रपटाचा ट्रेलर आणि गाणी देखील रिलिज झाली आहेत. यांना प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद देखील मिळत आहे. त्यामुळे आता चित्रपटाचे कलाकार देखील 'ड्रीम गर्ल 2'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. काही दिवसांनी हा सिनेमा थिएटरमध्ये दाखल होणार आहे.
2019 मध्ये आलेल्या 'ड्रीम गर्ल'चा हा सिक्वेल आहे. पहिल्या भागात नुसरत भरूचा आणि आयुष्मान खुराना हे दोन्ही कलाकार होते तर यावेळी सिक्वेलमध्ये नुसरत भरुचाच्या जागी अनन्या पांडेला कास्ट करण्यात आले आहे.
त्यामुळे आता या चित्रपटात नुसरत दिसणार नाही. एकीकडे तिच्या चाहत्यांना देखील हे मुळिच आवडलेल नाही. तर दुसरीकडे नुसरतने देखील आता यावर प्रतिक्रिया दिली आहे.
तिच्या जागी अनन्या पांडेला घेतलं असल्याचं कळाल्यानंतर तिला कसं वाटलं तिची काय प्रतिक्रिया होती याबद्दल तिने एका मुलखातीत सांगितलं आहे.
ETimes शी बोलताना नुसरत भरुचाने यावर भाष्य केलं. ती म्हणाली की, चित्रपटाच्या पहिल्या भागात टीमसोबत काम करताना तिला खूप मजा आली होती. मात्र या सिनेमाच्या दुसऱ्या भागात तिला का घेतलं नाही याबद्दल तिला काही माहित नाही. याचे उत्तर आता ड्रीम गर्ल 2 चे निर्मातेच सांगू शकतात असं ही ती म्हणाली.
पुढे कास्टिंगबद्दल बोलतांना ती म्हणते की, ती देखील एक माणूस आहे, त्यामुळे तिला जेव्हा हे कळालं तेव्हा तिला नक्कीच वाईट वाटलं. अर्थातच ते अन्यायकारक होतं. चित्रपटात कोणाला कास्ट करायचा हा निर्मात्यांचा निर्णय आहे हे तिला आता समजलं आहे.
सध्या नुसरत भरुचा तिच्या 'अकेली' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. तिचा हा सिनेमा देखील 25 ऑगस्टला थिएटरमध्ये रिलिज होणार आहे जो आयुष्मान खुरानाच्या 'ड्रिम गर्ल2' ला टक्कर देईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.