Nutan Jayant Interview : अभिनेत्री नूतन जयंतची आता नवीन इनिंग सुरू होणार!

माझा पहिला चित्रपट होता खतरनाक. महेश कोठारे यांचा हा चित्रपट. या चित्रपटात माझ्याबरोबरच लक्ष्मीकांत बेर्डे होते.
Nutan Jayant Marathi Actress interview viral
Nutan Jayant Marathi Actress interview viralesakal

Nutan Jayant Marathi Actress interview viral : रंगभूमीबरोबरच विविध जाहिराती, मालिका आणि चित्रपट करणारी अभिनेत्री नूतन जयंत आता वेबसीरीज करीत आहे तसेच ती लवकरच स्वतःचे प्राॅडक्शन हाऊस स्थापन करून चित्रपट, मालिका आणि सीरीज बनविणार आहे. त्यानिमित्त तिच्याशी केलेली बातचीत..

१. तुला पहिला चित्रपट मिळाला तेव्हा तू किती घाबरली होतीस किंवा कॅमेऱ्याचा पहिल्यांदा सामना करताना तुला कसे काय वाटले...

माझा पहिला चित्रपट होता खतरनाक. महेश कोठारे यांचा हा चित्रपट. या चित्रपटात माझ्याबरोबरच लक्ष्मीकांत बेर्डे होते. माझे नाटक होते बायको कमाल मेव्हणी धमाल नावाचे. ते नाटक पाहायला शिवाजी मंदिरला महेश कोठारे आले होते. मध्यांतराच्या वेळेस ते मला येऊन भेटले आणि मला म्हणाले, की मला लक्ष्मीकांतच्या अपोझिट काम करण्यासाठी तुला घ्यायचेआहे. पहिल्यांदा माझा या गोष्टीवर विश्वास बसला नाही.

मी एखादे स्वप्न पाहतेय की काय असे मला वाटले. परंतु दुसऱ्याच दिवशी त्यांनी आॅफिसात बोलावून मला साईन केले. पंधराएक दिवसांनी कोल्हापूरच्या शालिमार स्टुडिओत चित्रीकरण आहे असेही सांगितले. त्यावेळी मी तशी नवखी होते आणि लक्ष्मीकांत बेर्डे सुपरस्टारबरोबर काम करायला मिळाले. त्यानंतर मी लक्ष्मीकांत यांच्याबरोबर तीन चित्रपट केले. पहिल्यांदा कॅमेऱ्याचा सामना करताना घाबरले होते. पण महेश कोठारे आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांनी मला खूप मार्गदर्शन केले.

२. लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याबरोबर काम करूनही तुझ्या करिअरला ज्या पद्धतीने वळण मिळायला हवे होते ते मिळाले नाही असे तुला वाटत नाही...

-नक्कीच वाटते. कारण आमच्या जोडीला प्रेक्षकांनी चांगली पसंती दिली होती. परंतु माझे नशीब खराब होते असे मी म्हणेन. कारण त्यानंतर ते आजारी पडले आणि त्यातच त्यांनी या जगाचा निरोप घेतला. त्यानंतर अशोक शिंदे आणि अलका कुबल, भरत जाधव आणि क्रांती रेडकर अशा काही जोडींना प्रेक्षक पसंती देऊ लागले आणि या एकूणच चक्रामध्ये मी कुठे तरी हरवले. त्यावेळी नाटक मी करू लागले. तेव्हा टीव्ही इंडस्ट्री आजच्या इतकी काही वाढीस लागलेली नव्हती. असो. परंतु मी स्वतःला भाग्यवान समजते की मला लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासारख्या कलाकाराबरोबर काम करण्याची संधी मिळाली. आतापर्यंत मी तीसेक चित्रपट, एकवीस नाटके आणि अठरा टीव्ही मालिका केल्या आहेत. आता स्वतःचे प्राॅडक्शन हाऊस सुरू करून प्रेक्षकांना चांगल्या सकस कलाकृती देण्याचा विचार करीत आहे.

३. तुझ्या प्रॉडक्शन हाऊसचे नाव काय आहे आणि या प्राॅडक्शन हाऊसतर्फे काय प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

- माझ्या प्रॉडक्शन हाऊसचे नाव एन. जे. प्रॉडक्शन असे आहे आणि या प्रॉडक्शन हाऊसतर्फे मी मालिका, वेबसीरीज तसेच चित्रपटांची निर्मिती करणार आहे. आता काही कथा मी ऐकत आहे. त्यातून अंतिम निवड झाल्यानंतर सगळ्या बाबी जाहीर करणार आहे. तसेच पार्वती प्रभा ही एक संस्था आहे आणि त्या संस्थेतर्फे मी गरीब आणि गरजू लोकांना मदत करीत असते.

४. सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मला खूप महत्त्व आलेले आहे. याबाबतीत तू काय सांगशील...

- मी एक वेबसीरीज आता करीत आहे. खूप छान भूमिका आहे त्यामध्ये. राजू पार्सेकर या सीरीजचे दिग्दर्शक आहेत. ही सीरीज महिलाप्रधान आहे आणि त्यामध्ये माझी भूमिका महत्त्वपूर्ण आहे. त्याशिवाय चल लवकर या नावाचे नाटक सध्या सुरू आहे.

Nutan Pandit
Nutan Pandit

५. वेबसीरीज तू पहिल्यांदाच करीत आहेस. या नवीन माध्यमाबाबत तुझे मत काय आहे...

-- हे माध्यम खूप छान आहे. येथे पहिला भाग यशस्वी झाला की लगेच दुसरा भाग आणला जातो. लेखक आणि दिग्दर्शक यांना आपल्या कथाकल्पना मांडायला चांगला वाव मिळतो. मीदेखील आता वेगवेगळ्या सीरीज पाहते आहे. कोरोनानंतर प्रेक्षक टीव्ही आणि अशा सीरीजकडे अधिक वळलेला आहे. त्याला मनोरंजनाचा खजिनाच उपलब्ध झाला आहे. अनेक कलाकारांना कामे मिळू लागली आहेत. परंतु यामुळे चित्रपटांचे नुकसान होत आहे. प्रेक्षक चित्रपटगृहाकडे फारसे फिरकत नाही आहेत. त्यामुळे आता प्रेक्षकांना चित्रपटगृहात खेचून आणणे कठीण झाले आहे. काही तरी वेगळे करण्याचा प्रयत्न केला तरच प्रेक्षक चित्रपटगृहात येतात. त्याकरिता कलाकार कोण आहेत वगैरे बाबी ते पाहात नाहीत.

Nutan Jayant Marathi Actress interview viral
Kangana Ranaut : 'बंगल्याची भरपाई नको, एकनाथ शिंदेंनी मला तर...' कंगनाचा गौप्यस्फोट!

६. मराठी चित्रपटसृष्टीत काही कंपू तयार झाले आहेत. तुला याबाबतीत काय वाटते.

- मी कंपू असे म्हणणार नाही. कम्फर्ट झोन तयार झाले आहेत असे म्हणेन. कारण एकदा एका दिग्दर्शकाबरोबर काम केले आणि तो दिग्दर्शक आणि कलाकार यांचे चान बाॅण्डिंग तयार होते आणि मग ते वारंवार एकत्र काम करतात. ही ट्युनिंग जमणे खूप आवश्यक आहे. त्याला कंपू असे म्हणता येणार नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com