Nysa Devgn Video: तू कोणत्या ग्रहावरुन आलीस? सिंघमच्या पोरीला धड हिंदी बोलता येईना! नेटकऱ्यांनी घेतली शाळा

Nysa Devgn Video
Nysa Devgn VideoEsakal
Updated on

बॉलिवूड अभिनेता अजय देवगण आणि काजोल यांची मुलगी न्यासा देवगण ही काही न करताही अनेकदा चर्चेत असते. कधी ती पार्टीमध्ये दिसते तर कधी व्हेकेशन्सवर स्पॉट होते. सोशल मीडियावरही तिचे व्हिडिओ व्हायरल होत असतात.

Nysa Devgn Video
Onkar Bhojane: 'हौस आकाशी उंच उडायची', ओंकार भोजनेबद्दल सत्यजीत तांबेंची 'ती' पोस्ट व्हायरल

तिचा स्वतःचा वेगळा चाहता वर्ग आहे, जो तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करतो तर एक वर्ग तिला नेहमीच ट्रोल करत असतो. सध्या बॉलिवूड स्टारकिड असल्यामुळेही तिला ट्रोलिंगला सामोर जावं लागतं. असंच काहीस यावेळी ही झालं. तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तिला हिंदी बोलता येत नाही आहे.

Nysa Devgn Video
Sonu Nigam Attack: सोनू निगमला वाचवणारा रब्बानी खान आहे तरी कोण?

वास्तविक, न्यासा देवगण अहमदनगरमध्ये एका कार्यक्रमात पोहोचली होती. तिथं तिने गावातील गरजू मुलांसाठी तयार करण्यात आलेल्या डिजिटल लायब्ररीचे उद्घाटन केले.

अजय देवगणच्या एनवाय फाऊंडेशनने देशातील 200 गावांमध्ये सक्रिय असलेल्या संस्थेशी हातमिळवणी केली आहे. असं वृत्त आहे. आता न्यासाही या संबंधित कार्यक्रमात सहभागी झाली होती. यावेळी तिने मुलांना वह्या व क्रीडा किटचे वाटप केले.

आता ती एवढ्या मोठ्या कार्यक्रमाला गेल्याने तिथल्या मुलांना प्रेरीत करण्यासाठी तिला काहीतरी बोलण्याची विंनती करण्यात आली असेल. त्यामुळं तिनं माईक पकडला गेला. मात्र तिथं इंग्रजीत नव्हे तर त्यामुळे भाषण हिंदीतच द्यायचे होतं, न्यासा देवगण हिने मुलांना शिक्षण आणि पुस्तके वाचनाचे महत्त्व सांगितले. पण तिला हिंदी बोलता येत नसल्याने तुटलेल्या उच्चारात तिनं हे भाषण केलं

Nysa Devgn Video
Nysa Devgan : मुलगी न्यासाच्या हॉटनेसपुढे काजोल फिकी, पाहा BOLD PHOTO

तिच्या या व्हिडिओ ट्विटर वर व्हायरल झाला असून नेटकरी यावर प्रतिक्रिया देत आहेत. काही तिला हिंदी भाषेबद्दल ट्रोल करत आहे तर काहींनी ती करत असलेल्या कामाचं कौतुक करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.