OMG 2 Twitter Review: अक्षय कुमारचा OMG 2 पहायचा की नाही? काय म्हणतो ट्विटर रिव्ह्यू

OMG 2 Twitter Review:
OMG 2 Twitter Review: Esakal
Updated on

OMG 2 Twitter Review:

अनेक वाद विवाद अन् विरोधात आज अखेर बॉलीवूड खिलाडी अक्षय कुमारचा चित्रपट 'ओह माय गॉड-2' चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. आज अक्षय कुमारचा 'ओह माय गॉड 2' आणि सनी देओलचा 'गदर 2' बॉक्स ऑफिसवर भिडणार आहेत. दोन्ही चित्रपट हे सिक्वेल आहेत त्यामुळे आता पहिला भाग पाहणारे प्रेक्षक या चित्रपटासाठी खुप उत्सुक आहेत.

OMG 2 Twitter Review:
Jailer Box Office Collection Day 1: रजनीचा पिक्चर म्हणजे विषयचं हार्ड! पहिल्याच दिवशी जेलरनं केली 'इतकी' कमाई..

अक्षयच्या OMG2 चित्रपटाचा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहणाऱ्या प्रेक्षकांनी आता ट्विटरवर या चित्रपटाचा रिव्ह्यू देण्यास सुरुवात केली आहे. अक्षय कुमारचा OMG 2 पाहिल्यानंतर चाहत्यांना हा चित्रपट कसा वाटला आणि इतरांनी चित्रपट पाहण्यासाठी जावं कि नाही अशा अनेक प्रतिक्रिया आता प्रेक्षक ट्विटरवर देत आहेत.

लैंगिक शिक्षणावर आधारित या चित्रपटात अक्षय कुमारशिवाय पंकज त्रिपाठी, यामी गौतम, गोविंद नामदेव, अरुण गोविल असे अनेक कलाकार दिसताय. या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने ए प्रमाणपत्र दिलं आहे. अक्षय कुमार या चित्रपटात यावेळी भगवान महादेवाच्या रूपात दिसत आहे. आता गदरच्या तुलनेत या चित्रपटाला कमी स्क्रिन मिळाल्या असल्या तरी चित्रपटाला प्रेक्षकांच्या सकारात्मक प्रतिक्रिया मिळत आहेत.

OMG 2 Twitter Review:
Manipur Violence : मणिपूर घटनेवर अमेरिकेच्या गायिकेचे PM मोदींना समर्थन! म्हणाली, "तुमच्या स्वातंत्र्यासाठी..."

आता प्रेक्षकांनी या चित्रपटाबद्दल काय रिव्ह्यू दिलाय त्यावरही नजर टाकूया. हा चित्रपट पाहणाऱ्या एकाने अक्षयच्या चित्रपटाबद्दल आपलं मत मांडलं आहे आणि लिहिलयं की , "चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाकडून प्रमाणपत्र मिळालं आणि गदर 2 पेक्षा कमी स्क्रीन मिळाल्यात तरी देखील या चित्रपटाची ताकद काही कमी झालेली नाही. त्याने पुन्हा एकदा स्वत:ला सिद्ध केले. OMG2 खूप छान कामगिरी करेल."

तर एकानं लिहिलयं की, सकाळीच OMG2 पाहिला, मला त्यात A प्रमाणपत्र देण्यासारखं काही वाटलं नाही. मुळातच ज्यांच्यासाठी हा चित्रपट बनवला आहे, त्यांनाच हा बघण्यापासून थांबवलं आहे पण पालकांनी असा मुद्दा पहावा. जो सुपरस्टार कधीच मांडू शकत नाही शिवाय @akshaykumar आणि पकंज त्रिपाठी यांच काम खुपच छानच आहे.

'कधी कधी अक्षय कुमारच्या स्क्रिप्टच्या निवडीमुळे थक्क होतो. नाही कोणताही सुपरस्टार हा टॉयलेट एक प्रेम कथा, PADMAN, अतरंगी रे किंवा OMG 2, अशा लैंगिक शिक्षणावर आधारित चित्रपट करणार नाही. तो खरचं खुपच धाडसी आहे आणि त्याला याच श्रेय मिळायलाच हवे.'

OMG 2 Twitter Review:
Jailer Review: बाप 'बाप' असतो, त्याचा नाद करायचा नाय! रजनीचा 'जेलर' एकदम 'किलर'

अक्षय कुमारच्या चित्रपटावर आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना दुसर्‍यानं लिहिलयं की, "OMG 2 हा एक जबरदस्त चित्रपट आहे. अॅडल्ट एजुकेशनचा मुद्दा कोणीही अधिक जबाबदारीने आणि मनोरंजक पद्धतीने सांगू शकला नसता. हा सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक आहे." पंकज त्रिपाठी यांची चमकदार कामगिरी आणि अक्षय आणि यामीनं कमाल केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.