OMG 2 : 'आई बाबा म्हणाले, तू तो चित्रपट पाहायला जायचं नाही!' ओएमजीच्या कलाकारानं सांगितला अनुभव

प्रेक्षकांनी अक्षयच्या नव्या चित्रपटाचे कौतूक केले आहे. सध्याच्या काळात जो महत्वाचा विषय आहे त्याला अक्षयनं प्रभावीपणे मांडले आहे.
Aarush Varma played the role of Pankaj Tripathi's son in 'OMG 2'
Aarush Varma played the role of Pankaj Tripathi's son in 'OMG 2' esakal
Updated on

Aarush Varma played the role of Pankaj Tripathi's son in 'OMG 2' : बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा ओएमजी २ प्रेक्षकांना भलताच भावला आहे. त्याची वेगवेगळ्या माध्यमांवर चर्चा सुरु झाली आहे. भलेही सनीच्या गदरनं ओएमजीपेक्षा सर्वाधिक कमाई केली असेल मात्र अक्षयच्या चित्रपटाचा विषय आणि त्याची मांडणी प्रेक्षकांना आवडली आहे.

प्रेक्षकांनी अक्षयच्या नव्या चित्रपटाचे कौतूक केले आहे. सध्याच्या काळात जो महत्वाचा विषय आहे त्याला अक्षयनं प्रभावीपणे मांडले आहे. त्यावर चर्चा घडवून आणली आहे. त्यामुळे त्याला धन्यवाद द्यायला हवेत. आपल्या शिक्षण पद्धतींमध्ये अद्यापही लैंगिक शिक्षणाबाबत उदासीनता आढळून येते. त्यावर कुणी मोकळेपणानं बोलतही नाही. अशावेळी ओएमजी २ त्यावर परखडपणे बोलतो. अशा प्रतिक्रिया अक्षयच्या त्या चित्रपटावर आल्या आहेत.

Also Read - दिल्लीतल्या केवळ प्रशासकीय बदल्यांपुरतंच मर्यादित नाही, दिल्ली सेवा विधेयक. काय आहेत तरतुदी जाणून घ्या

यात ओएमजी २ मधील बालकलाकाराच्या भूमिकेत असणाऱ्या आरुष वर्मानं या चित्रपटाविषयी एक महत्वाची गोष्ट सांगितली आहे. अकरा ऑगस्ट रोजी देशात प्रदर्शित झालेल्या ओएमजी २ या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डानं ए प्रमाणपत्र दिले. केवळ प्रौढांसाठीच असे प्रमाणपत्र देणे आणि चित्रपटात १५ हून अधिक कट्स सुचवल्यानं निर्मात्यांची निराशा झाली होती.

सेन्सॉर बोर्डाच्या या कृतीवर अक्षयनं देखील एका मुलाखतीमध्ये टिप्पणी केली होती. जो चित्रपट प्रत्येक नागरिकानं पाहायला हवा, जो विषय प्रत्येकानं समजून घ्यायला हवा त्याच विषयावरील चित्रपटाला बोर्डानं ए प्रमाणपत्र दिले आहे. हीच किती मोठी गंमत आहे. अशा शब्दांत अक्षयनं त्याची प्रतिक्रिया दिली होती. निर्मात्यांनी देखील नाराजी व्यक्त केली होती.

Aarush Varma played the role of Pankaj Tripathi's son in 'OMG 2'
Akshay Kumar Post: ओह माय गदर! OMG2 च्या कमाईनं अक्षय खुश! गदर2चं ही केलं प्रमोशन

यात ओएमजीमध्ये शाळकरी विवेकची भूमिका करणाऱ्या आरुषची प्रतिक्रिया समोर आली आहे. इंडिया टुडेमध्ये आलेल्या त्या प्रतिक्रियेनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. तो म्हणतो की, मला जेव्हा सेन्सॉर बोर्डानं आमच्या चित्रपटाला ए प्रमाणपत्र दिले आहे असे कळले तेव्हा धक्काच बसला. त्यानंतर मलाही घरच्यांनी हा चित्रपट तुला थिएटरमध्ये जाऊन पाहता येणार नाही असे सांगितले होते.

आरुषनं ओएमजी २ मध्ये पंकज त्रिपाठी यांच्या मुलाची विवेकची भूमिका साकारली आहे. सेन्सॉर बोर्डानं सांगितल्याप्रमाणे ज्या चित्रपटांना ए सर्टिफिकेट दिले आहे ते चित्रपट १८ वर्षाखालील मुलांना पाहता येत नाहीत. आरुषचे वय १६ वर्षे आहे. मलाच माझा पहिला चित्रपट पाहताना मोठ्या संकटाला सामोरं जावं लागल्याचे आरुषनं म्हटले आहे.

Aarush Varma played the role of Pankaj Tripathi's son in 'OMG 2'
OMG 2 Twitter Review: अक्षय कुमारचा OMG 2 पहायचा की नाही? काय म्हणतो ट्विटर रिव्ह्यू

तुम्ही कुणी ही फिल्म पाहिल्यास तुम्हाला त्यातून लैंगिक शिक्षण देणे हाच उद्देश आम्ही ठेवला आहे. मुलांना त्या वयात कोणत्या प्रकारे मार्गदर्शन केले पाहिजे, त्यांच्याशी कशाप्रकारे संवाद साधला पाहिजे याविषयी चित्रपटामध्ये सांगण्यात आले आहे. पण त्याला अॅडल्ट सर्टिफिकेट दिल्यानं अनेकांची निराशा झाल्याचे आरुषनं म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.