Akshay Kumar OMG 2 Controversy: बॉलीवूड खिलाडी कुमार म्हणजेच अक्षय कुमारचा नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट 'OMG 2' ची लोकांमध्ये चांगलीच क्रेझ आहे. सनी देओलच्या गदर2 पुढे हा सिनेमा फिका ठरला असला तरी या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
मात्र जितकी या चित्रपटाची क्रेझ आहे तितकाच या चित्रपटाला विरोध देखील होत आहे. या चित्रपटात अक्षय कुमार भगवान शिव यांच्या दूताच्या भूमिकेत दिसत आहे. या चित्रपटाचा कंटेंट हा आउट ऑफ द बॉक्स आहे. याच कारणाने या चित्रपटाला विरोध देखील होत आहे.
या चित्रपटात अक्षय कुमार हा भगवान शिव यांचा दूत दाखवल्याबद्दल लोकांमध्ये प्रचंड संताप आहे. अनेक लोक याला भगवान शिव आणि हिंदू देवतांचा अपमान म्हणत आहेत. अक्षय कुमारला त्यामुळे प्रचंड ट्रोल देखील केलं जात आहे.
या चित्रपटातील त्याची भुमिका बऱ्याच लोकांना आवडलेली नाही. त्याच्याबद्दल द्वेष इतका वाढला आहे की एका हिंदू संघटनेने अक्षयला कानखाली मारल्यास 20 लाख रुपये देण्याची घोषणाही केली आहे.
आग्रा येथील एका हिंदू संघटनेने यासाठी 20 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. तर दुसरीकडे, राष्ट्रीय हिंदू परिषद भारतने गुरुवारी अक्षय कुमारचे पुतळे आणि चित्रपटाचे पोस्टर जाळत विरोध दर्शवला. चित्रपटगृहांसमोर प्रदर्शन करत राहतील आणि मागे हटणार नाहीत अशी भुमिका त्यांनी घेतली.
'OMG 2' चित्रपटात भगवान शिवाच्या दूताची भूमिका साकारणाऱ्या अक्षय कुमारला कानाखाली मारल्यास संस्थेचे अध्यक्ष गोविंद पाराशर यांनी पुरस्काराची घोषणा केलीआहे.
त्यांनी दावा केला आहे की अक्षयने त्याच्या चपलांमध्ये जटा ठेवून भगवान शिव यांचा अपमान केला आहे. त्याचबरोबर घाणेरड्या तलावात साडी नेसून आंघोळ करणे, या सर्व गोष्टीमुळे त्याने देवाच्या प्रतिमेला कलंकित केले आहे.
चित्रपटावर कठोर टीका करत त्यांनी लोकांच्या भावनांशी खेळण्याचं पाप केल्याचा आरोप केला आला आहे.
'OMG' 2012 साली प्रदर्शित झाला आणि त्याच्या दमदार कथेमुळे या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर भरपूर कमाई केली. आता या चित्रपटाचा 'OMG 2' सिक्वेल देखील थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे.
एका बाजूला विरोध होत असला तरी या चित्रपटाला प्रेक्षकांचा पाठिंबा देखील मिळत आहे. अक्षय कुमारच्या OMG 2 ने रिलीजच्या पहिल्या दिवशी फक्त 10 कोटींची कमाई केली आहे. तर दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 15 कोटींचा व्यवसाय केला आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.