OMG 2 OTT : 'रॉकी और रानी' चा किसिंग सीन चालतो, मग आमच्या चित्रपटाचा विषय का टोचतो'? 'ओएमजी'च्या दिग्दर्शकांचा संताप!

बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा ओएमजी २ हा बॉक्स ऑफिसवर फार मोठी कमाई करु शकला नाही.
OMG 2 Director Amit Rai Slams CBFC, CONFIRMS Film's
OMG 2 Director Amit Rai Slams CBFC, CONFIRMS Film's esakal
Updated on

OMG 2 Director Amit Rai Slams CBFC, CONFIRMS Film's : बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा ओएमजी २ हा बॉक्स ऑफिसवर फार मोठी कमाई करु शकला नाही. त्याला कारणही तसेच होते. एकतर त्या चित्रपटावर सेन्सॉर बोर्डानं अनेक आक्षेप घेतले होते. दुसरी गोष्ट त्याची थेट सनी देओलच्या गदर सोबत स्पर्धा होती. त्याचा फटका त्याला बसला होता. (लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर... फॉलो करण्यासाठी या लिंकवर करा क्लिक)

आता ओएमजी २ हा ओटीटीवर प्रदर्शित होणार असून त्याविषयी दिग्दर्शक अमित राय यांनी दिलेल्या प्रतिक्रिया दिली आहे. त्याची चर्चा होताना दिसत आहे. यापूर्वी अमित राय यांनी सेन्सॉर बोर्डावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली होती. आमच्या चित्रपटाचा विषय हा सगळ्यांसाठी महत्वाचा आहे. ज्या विषयाची खुलेपणानं चर्चा होणं गरजेचं आहे त्या विषयावर तितक्या मोकळेपणानं बोलता येत नाही. आणि त्याला ज्यांच्याकडून सहकार्य हवं आहे त्यांच्याकडून ते मिळत नाही.

Also Read - Male Andropause: काय सांगता पुरुषांनाही येते रजोनिवृत्ती?

ओएमजी २ हा ओटीटीवर येत असून त्याविषयी राय यांनी पुन्हा एकदा सेन्सॉर बोर्डावर आगपाखड केली आहे. त्यात ते म्हणतात, तुम्ही रॉकी और रानी जसा आहे तसा ओटीटीवर प्रदर्शित करता. त्यामध्ये तर किसिंग सीन देखील दाखविण्यात आले आहे. हे कसे काय चालते, याचे उत्तर सेन्सॉर बोर्ड देईल का, ओएमजी २ ओटीटीवर दाखवताना तरी त्यात काही अंशी सूट देणे गरजेचे होते. मात्र तसे झाले नाही.

ओएमजी २ हा येत्या ८ ऑक्टोबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. अक्षय कुमार, पंकज त्रिपाठी, यामी गौतम यांच्या त्यात महत्वाच्या भूमिका आहे. यापूर्वी सेन्सॉर बोर्डाकडून ओएमजी २ ला A सर्टिफिकेट मिळाले होते. त्यावर मेकर्सनं नाराजी व्यक्त केली होती. त्यात तब्बल २७ कट्स सुचवले होते. त्यानंतर काय आम्ही आता काय करावं, असा प्रश्नही मेकर्सनं सेन्सॉर बोर्डाला विचारला होता.

OMG 2 Director Amit Rai Slams CBFC, CONFIRMS Film's
Video Viral : Unacademyच्या शिक्षकाकडून PM मोदींची तुलना मोहम्मद घोरीशी; म्हणाले, 'नवीन संसद त्यांचा राजवाडा...'

एका मुलाखतीमध्ये अमित राय यांनी सांगितले की, आम्हाला अगोदर सांगण्यात आले होते की, ओटीटीवर अनकट स्ट्रमिंग होईल.मात्र त्यानंतर काही दिवसांतच पुन्हा जे व्हर्जन थिएटरमध्ये दाखवण्यात आले होते तेच ओटीटीवर येणार असल्याचे सांगण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.