OMG 2 Review News: अक्षय कुमारचा OMG 2 सिनेमा आज शुक्रवारी रिलीज झालाय. अनेक दिवसांपासुन सिनेमाची उत्सुकता होती. अखेर हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला.
OMG 2 बद्दल अनेक दिवसांपासुन वाद - विवाद सुरु होते. अखेर हा सिनेमा आज सगळीकडे रिलीज झालाय. सिनेमा कसा आहे? सिनेमाचा विषय काय? सविस्तर पाहू
OMG 2 सिनेमाची कथा
OMG 2 ची कथा कांती शरण मुद्गल (पंकज त्रिपाठी) या सर्वसामान्य माणसाभोवती फिरतेय. कांतीचं सुखी चौकोनी कुटूंब. कांती महादेवाचा भक्त. त्याचं कुटुंबावर खुप प्रेम. समाजात सुद्धा कांतीला खुप मान - सन्मान आहे
कांतीचा मुलगा शाळेत शिकत असतो. एके दिवशी तो शाळेत एक लैंगिक कृत्य पकडताना पकडला जातो. त्यामुळे शाळेतुन त्याला काढून टाकलं जातं. कांतीच्या कुटुंबाला या घटनेने मोठा धक्का बसतो. कांतीचा मुलगा या घटनेने खुप निराश होतो. कांतीच्या कुटुंबाला समाजाच्या नाराजीला तोंड द्यावे लागते.
पुढे मुलाला न्याय देण्यासाठी कांती कोर्टात शाळेविरुद्ध केस दाखल करतो. आणि मग सुरु होते एक मोठी चर्चा. या सर्वात कांतीच्या मदतीला महादेव (अक्षय कुमार) अवतरतात.
जिथे जिथे कांतीला अडचण येते तिथे तिथे महादेव त्याला मदत करतात. मग पुढे कांती केस जिंकतो का? कांतीच्या मुलाला आणि त्याच्या कुटुंबाला तो मान परत मिळतो का? याची कहाणी म्हणजे OMG 2
OMG 2 चा विषय गंभीर पण...
OMG 2 चा विषय गंभीर आहे. लैंगिक शिक्षणाच्या अनेक गोष्टींना सिनेमा स्पर्श करतो. खुप महत्वाचे मुद्दे सिनेमात मांडले आहेत. अनेक चांगले प्रसंग सिनेमात दिसतात. उदा. जेव्हा एक वेश्या सिनेमाच्या कोर्टात तिची बाजु मांडते तेव्हा पंकज त्रिपाठी तिला वाकुन नमस्कार करतो. याशिवाय मध्यंतराआधी अक्षयने केलेला तांडव लक्षात राहतो. याशिवाय कोर्टात पंकज त्रिपाठींनी निरागसपणे मांडलेली बाजु हशा मिळवते.
सिनेमाचा विषय चांगला आहे पण, एका क्षणी त्याच त्याच मुद्द्यावर सिनेमात चर्चा होते असं वाटत राहतं. सिनेमा मध्यंतरापुर्वी फार संथ आहे. त्यामुळे सिनेमा पकड घेत नाही. पण मध्यंतरानंतर सिनेमात कोर्ट रुम ड्रामा चांगला रंगवलाय. पहिल्या भागात अक्षय कुमारला जितका वाव होता तितका तो या सिनेमात नाही. त्यामुळे अक्षयच्या फॅन्सचा भ्रमनिरास होऊ शकतो पंकज त्रिपाठीने स्वतःच्या खांद्यावर सिनेमा पेलला
पहिला भाग आणि OMG 2 ची तुलना
OMG 2 च्या विषयाची गरज म्हणा किंवा इतर कारणं असतील. अक्षय कुमारला सिनेमात तितकी स्पेस देण्यात आली नाही. संपूर्ण सिनेमात पंकज त्रिपाठींना खुप जास्त स्क्रिन टाईम मिळालाय. आणि त्यांनी कांती शरणची तगमग, त्याची मनाची घालमेल खुप उत्कट दाखवली आहे.
पंकज त्रिपाठी आणि अक्षय कुमार जेव्हा जेव्हा समोर येतात तेव्हा त्यांच्या अभिनयाची जुगलबंदी पहायला मजा येते.
एकुणच OMG च्या पहिल्या भागात मनोरंजन, कॉमेडी आणि गांभीर्य यांचा जो मिलाफ होता त्याचा OMG 2 मध्ये अभाव जाणवतो. पण तरीही जो विषय मांडलाय तो एकदा पाहण्यास काही हरकत नाही
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.