Sunny Vs Akshay Kumar : ज्या ज्या वेळेस सनीच्या समोर अक्षय आला तोंडावर आपटला, आताही...!

Gadar 2,OMG 2 : अक्षय कुमारचा ओएमजी २ आणि सनीचा गदर २ हे एकाच दिवशी प्रदर्शित झाल्यानं मोठी स्पर्धा तयार झाली आहे.
OMG 2 Vs Gadar 2 Akshay Kumar Sunny Deol clashed
OMG 2 Vs Gadar 2 Akshay Kumar Sunny Deol clashed esakal
Updated on

OMG 2 Vs Gadar 2 Akshay Kumar Sunny Deol clased : सनी देओलचा गदर २ प्रदर्शित झाला आहे. दुसरीकडे अक्षयचा ओएमजी २ देखील प्रेक्षकांच्या भेटीला आहे. यापूर्वी अक्षय, आमिर, शाहरुखचे आणि सनीच्या चित्रपटांची टक्कर झाली आहे. त्यात बऱ्याचदा सनीला हार मानावी लागली आहे. तर काही वेळा तो जिंकला आहे.

अक्षय कुमारचा ओएमजी २ आणि सनीचा गदर २ हे एकाच दिवशी प्रदर्शित झाल्यानं मोठी स्पर्धा तयार झाली आहे. यात कुणाची सरशी होणार, कोण बाजी मारणार याची अनेकांना उत्सुकता आहे. त्यामुळेच की काय या दोन्ही सेलिब्रेटींमधील पूर्वीच्या गोष्टींना सोशल मीडियावर उधाण आल्याचे दिसून येत आहे.

Also Read - दिल्लीतल्या केवळ प्रशासकीय बदल्यांपुरतंच मर्यादित नाही, दिल्ली सेवा विधेयक. काय आहेत

ही गोष्ट २७ वर्षांपूर्वीची आहे. ८ नोव्हेंबर १९९६ मध्ये सनीचा घातक नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्याचवेळी अक्षयचा सपूत प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. यावेळी चाहत्यांचा सनीच्या घातकला तुफान प्रतिसाद मिळाला होता. त्या चित्रपटानं त्यावेळी २६ कोटींची कमाई केली होती. त्याचे बजेट साडेसहा कोटींचे होते. सनीच्या या चित्रपटानं तिप्पट कमाई केल्याचे दिसून आले होते.

सपूतनं मार खाल्ला होता. त्यात अक्षय आणि सुनील शेट्टी दोघे होते. मात्र हे दोन तगडे स्टार असूनही चाहत्यांना त्या चित्रपटाला नाकारले होते. त्या चित्रपटानं फक्त पावणे बारा कोटींची कमाई केली होती. सनीच्या घातक चित्रपटाच्या तुलनेत सपूतनं मार खाल्ला होता. त्या चित्रपटाची कमाईही फारच कमी होती.

OMG 2 Vs Gadar 2 Akshay Kumar Sunny Deol clashed
रस्ते झाले सस्ते! नवं बांंधकाम केलेल्या रस्त्याचे हाताने निघतेय डांबर, नागरिक संतप्त | Video Viral

२००१ मध्ये गदरचा पहिला भाग प्रदर्शित झाला होता. त्यानंतर आता २२ वर्षांनी त्याचा सिक्वेल आला आहे. त्याला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. पुढील आठवडा तर गदर ला प्रचंड प्रतिसाद मिळणार असल्याचे बोलले जात आहे. १५ ऑगस्ट चे निमित्त आणि भारत पाकिस्तानचा संदर्भ यामुळे गदर जोरदार कमाई करेल असे बोलले जात आहे. ओएमजी विषयी बोलायचे झाल्यास त्याचा पहिला भाग हा २०१२ मध्ये प्रदर्शित झाला होता.

ओएमजी १ ला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले होते. चित्रपटाचा विषय, त्याची मांडणी,त्यातील संवाद आणि कलाकारांचा अभिनय यामुळे हा चित्रपट चर्चेत आला होता. त्यामध्ये अक्षय कुमार, परेश रावल यांच्या भूमिका होत्या. सिक्वेलमध्ये अक्षय कुमार, पंकज त्रिपाठी आणि यामी गौतम यांच्या भूमिका आहेत. गदर आणि ओएमजी हे चाहत्यांच्या फेव्हरेट लिस्टमधील चित्रपट आहेत.

OMG 2 Vs Gadar 2 Akshay Kumar Sunny Deol clashed
OMG 2 Twitter Review: अक्षय कुमारचा OMG 2 पहायचा की नाही? काय म्हणतो ट्विटर रिव्ह्यू

आता यासगळ्यात अक्षय जिंकणार की सनी हे थोड्याच दिवसांत स्पष्ट होईल. मात्र सध्या या दोन्ही कलावंतांच्या चित्रपटांच्या कमाईच्या आकडेवारी विषयी बोलायचे झाल्यास त्यात अक्षय पिछाडीवर आहे. सनीच्या गदर २ ने पहिल्याच दिवशी चाळीस कोटींची कमाई केल्याचे दिसून आले आहे. यावरुन बॉक्स ऑफिसवर मोठा गदर पाहायला मिळणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.