प्रिती झिंटाला आपण सर्वजण ओळखतो. बॉलिवूड अभिनेत्री झिंटा ही आयपीएल टीम पंजाब किंग्सची सह-मालक आहे. आज जरी ती इंडस्ट्रीपासून दूर असली, पण तिच्या फॅन फॉलोइंगवर याचा फारसा फरक पडलेला नाही. ती सोशल मीडियावर सक्रिय राहते आणि फोटो आणि व्हिडिओ शेअर करून चाहत्यांशी कनेक्ट राहते.
नुकतच तिनं चाहत्यासोबत एक व्हिडिओ शेयर केला आणि यात तिने तिचा अनुभव चाहत्यांसोबत शेयर केला. तिच्या आईच्या सांगण्यावरुन तिने बारा ज्योतिर्लिंगांचा प्रवास सुरु केला आहे. त्यानुसार तिने नुकतिच भारतातील बारा आदि ज्योतिर्लिंगांपैकी पहिल्या सोमनाथ मंदिराला भेट दिली जे गुजरातमध्ये आहे. या मंदिरात गेल्यानंतर तिला कसं वाटलं याबद्दल वर्णन तिने या पोस्ट मध्ये केले.
'जेव्हा माझ्या आईने मला भारतातील 12 ज्योतिर्लिंगांना भेट देण्याचा आग्रह केला तेव्हा मी तिला नाही म्हणू शकले नाही. आम्हाला गुजरातमधील सोमनाथ मंदिरापासून सुरुवात करायची होती. मंदिर जवळून पाहून माझे मन भरुन आले. दुपारची आरती मनमोहक होती आणि मंदिर उर्जेने भरलेले होते. आयुष्याच्या मोठ्या टप्प्यावर कृतज्ञतेच्या भावनेत मी किती लहान आहे हे मला समजले. मी एकाच वेळी विनम्र आणि मोहित झाले होते.
हे सुंदर मंदिर भारतीय वारसा आणि उत्कृष्टतेचे प्रतीक आहे. मंदिर स्वच्छ होते आणि त्याची काळजी घेतली जात होती. मी प्रार्थना करण्यासाठी खाली वाकले तेव्हा मला जाणवले की माझी आई फक्त एक निमित्त होती. हा प्रवास माझ्यासाठीच होता. भोलेनाथालाच मी तिथे हवे होते. हा अत्यंत समाधानकारक आणि आध्यात्मिक प्रवास सुरू केल्याबद्दल मी माझ्या आईची सदैव ऋणी राहीन.
स्वत: एक आई म्हणून मला आशा आहे की मी माझ्या मुलांचं चांगले संगोपन करेन जेणेकरून त्यांना त्यांच्या समृद्ध संस्कृतीचा अभिमान वाटेल आणि त्यांना आतला नैतीक आणि विवेकी आवाज मिळेल. हे मंदिर तुम्ही जरूर पहा. मला खात्री आहे की मला जसा अनुभव आला तसा तुम्हालाही येईल.'
प्रिती झिंटाची ही पोस्ट सध्या बरीच व्हायरल होत आहे. ती आपल्या पती जीन गुडइनफ सोबत लॉस एंजेलिसमध्ये राहते. प्रितीला जिया आणि जय अशी दोन जुळी मुलं आहेत. प्रिती शेवटची 2018 साली प्रदर्शित झालेल्या "भैय्याजी सुपरहिट" या चित्रपटात दिसली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.