अॅनिमे फॅन्ससाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. जगप्रसिद्ध मांगा (Manga) आणि अॅनिमे सीरीज असणारी 'वन पीस' (One Piece) ही आता खऱ्या रुपात समोर येणार आहे. नेटफ्लिक्सवर याचं लाईव्ह अॅक्शन अॅडाप्शन दाखवण्यात येणार आहे. शनिवारी याचा ऑफिशिअल टीजर प्रदर्शित झाला.
काय आहे वन पीस?
इचिरो ओडा (Eiichiro Oda) या मांगा आर्टिस्टने बनवलेली ही मांगा सीरीज १९९७ साली प्रदर्शित झाली होती. यानंतर काही वर्षांनी टोई अॅनिमेशन या कंपनीने याचं अॅनिमे (One Piece Anime) व्हर्जन प्रदर्शित केलं. समुद्रातील पायरेट्सबद्दल असणारी ही सीरीज जगातील सर्वात प्रसिद्ध मांगा आणि अॅनिमे समजलं जातं.
यामध्ये मुख्य पात्र असणारा लुफी (Luffy) हा एक किशोरवयीन मुलगा आहे. जगातील सगळ्या पायरेट्सना हरवून 'पायरेट किंग' होण्याचं त्याचं स्वप्न आहे. यासाठी तो एका छोट्याशा नावेतून आपला प्रवास सुरू करतो. या प्रवासात त्याला कित्येक चांगले मित्र भेटतात, जे त्याच्या 'स्ट्रॉ हॅट पायरेट' (Straw Hat Pirates) क्रूमध्ये सहभागी होतात.
नेटफ्लिक्सचा प्रयत्न
मांगा किंवा अॅनिमेमध्ये ज्या गोष्टी सहज दाखवता येतात, त्या लाईव्ह अॅक्शनमध्ये दाखवणं जवळपास अशक्य असतं. शिवाय या सीरीजचे जगभरात अब्जावधी चाहते आहेत. त्यामुळे छोट्या चुकाही नेटफ्लिक्सला (Netflix One Piece) अगदी महागात पडू शकतात. तरीही नेटफ्लिक्सने ही जोखीम पत्करत या लाईव्ह अॅक्शन अॅडाप्शनची घोषणा केली होती.
यानंतर शनिवारी रात्री याचा टीजर प्रदर्शित करण्यात आला. या टीजरला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. या टीजरच्या माध्यमातून ही सीरीज कशी असू शकते याची कल्पना फॅन्सना मिळाली आहे. यासोबतच या सीरीजची भव्यताही यातून दिसून येत आहे. ३१ ऑगस्ट २०२३ रोजी ही सीरीज प्रेक्षकांच्या भेटीला (One Piece Netflix release date) येणार आहे.
१०००+ एपिसोड्स
नेटफ्लिक्ससमोरील आणखी मोठं आव्हान म्हणजे या अॅनिमेचे एपिसोड्स. वन पीस मांगाचे (One Piece Manga) एक हजारांहून अधिक चॅप्टर्स समोर आले आहेत. तर, या अॅनिमेचे देखील एक हजारांहून अधिक एपिसोड्स प्रदर्शित झाले आहेत. ही सीरीज अजूनही सुरू असून, पुढची काही वर्षं तरी संपण्याची शक्यता नाही. त्यामुळे या सीरीजमध्ये सातत्य राखणं नेटफ्लिक्सला नक्कीच अवघड जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.