Onkar Bhojane: 'हास्यजत्रा' फेम ओंकार भोजनेची गाडी सुसाट..आता थेट महेश मांजरेकरांच्या गोटात वर्णी

महेश मांजरेकर यांच्या नव्या प्रोजेक्टमध्ये ओंकार भोजने महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.
Onkar Bhojane
Onkar BhojaneInstagram
Updated on

Onkar Bhojane: महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून प्रकाशझोतात आलेला एक चेहरा म्हणजे ओंकार भोजने. या शो मध्ये असताना त्याला जेवढी लोकप्रियता मिळाली नसेल त्याहून दुप्पट लोकप्रियता त्याला शो सोडल्यावर मिळाली. ओंकारनं हास्यजत्रा सोडलं आणि रातोरात ती बातमी व्हायरल झाली.

कारण तोवर ओंकारनं झी मराठीवरचा फु बाई फु या प्रसिद्ध कार्यक्रमाच्या नव्या सिझनची ऑफर स्विकारली अशी चर्चा रंगली होती.

यावर अद्याप ओंकारनं तोंडातून एकही शब्द काढला नसला तरी अनेक प्रकारे यामागची कारणं समोर आलीत निर्माते-दिग्दर्शकांशी स्कीटवरनं बिनसलं,सहकलाकारांशी फाटलं..तर कुणी म्हटलं 'झी'नं मोठं मानधन देऊन खिशात टाकलं.(Onkar Bhojane Maharashtrachi Hasyajatra actor entry in mahesh manjrekar new project drama)

Onkar Bhojane
Shatrughan Sinha करणार होते चेहऱ्याची प्लास्टिक सर्जरी..देवआनंद असं काय बोलले की एका क्षणात बदललेला निर्णय

असो...आता हास्यजत्रा सोडली..फु बाई फु बंद पडलं असं असलं तरी ओंकारची गाडी सुसाट धावतेय..थेट मांजरेकरांच्या गोटात त्याची वर्णी लागल्याची बातमी आहे बरं का. आणि एकदा का मांजरेकरांचा वरदहस्त लाभला की मोठे प्रोजेक्ट सहज चालत येतात ही मराठी इंडस्ट्रीची परंपराच आहे.

तर,चला जाणून घेऊया नेमकं मांजरेकरांच्या कोणत्या कलाकृतीमध्ये ओंकार दिसणार आहे.

Onkar Bhojane
Jawan: शाहरुखच्या या सिनेमात स्टुडिओतलं शूटिंग नावालाच;प्रत्येक लोकेशन आहे रिअल, जाणून घ्या याविषयी सविस्तर

तर महेश मांजरेकर आणि नाट्यनिर्माते राहुल भंडारे मिळून 'करुन गेलो गाव' हे नाटक पुन्हा रंगमंचावर घेऊन येत आहेत. यामध्ये ओंकार भाऊ कदमच्या साथीनं अभिनयाची सुसाट बॅंटिग करताना दिसणार आहे.

'करुन गेलो गाव' या नाटकाविषयी थोडक्यात सांगायचं तर हे मालवणी भाषेतलं नाटक आहे. आणि मालवणी भाषेतील नाटकांनी एक काळ गाजवला आहे हे वेगळं सांगायला नकोच.

त्यात कॉलेज जीवनात ओंकारनं एकांकिका गाजवल्यात त्यामुळे आता भाऊ कदमच्या साथीनं या नाटकातही तो भाव खाऊन जाणार हे नक्की. 'करुन गेलो गाव' या नाटकाचे लेखन-दिग्दर्शन राजेश देशपांडे यांनी केले आहे.

तसं पाहिलं तर हास्यजत्रा सोडल्यानंतर ओंकार काही ऐकत नाही हे स्पष्ट दिसून आलं आहे. त्यानं 'सरला एक कोटी' हा सिनेमा केलाय ज्याला प्रदर्शनानंतर लोकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसला तर काही हिंदी प्रोजेक्टमध्येही त्याची वर्णी लागली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.