Oppenheimer: तो सीन पास केलाच कसा... इंटिमेट सीन अन् भगवद्गीता वादावर अनुराग सिंग ठाकुरही भडकले

क्रीडामंत्री अनुराग सिंग ठाकुर यांनी ओपनहायमर सिनेमातील या प्रसंगावर संताप व्यक्त केलाय.
Oppenheimer Anurag Singh Thakur also got angry over the intimate scene and Bhagavad Gita controversy
Oppenheimer Anurag Singh Thakur also got angry over the intimate scene and Bhagavad Gita controversy SAKAL
Updated on

Oppenheimer Anurag Thakur News: सध्या भारतात नव्हे तर जगभरात चर्चा आहे ती ओपनहायमर सिनेमाची. हा सिनेमा २१ जुलेैला भारतात आणि जगभरात रिलीज झाला. ओपनहायमर सिनेमाचं इंडीयन कनेक्शन म्हणजे सिनेमात वापरलेली भगवद्गगीता.

सिनेमात ओपनहायमर भगवद्गीता म्हणतात असा एक प्रसंग दिसतो. पण या प्रसंगावर भारतातील अनेक प्रेक्षकांनी संताप व्यक्त केलाय. अशातच क्रीडामंत्री अनुराग सिंग ठाकुर यांनी सिनेमातील या प्रसंगावर संताप व्यक्त केलाय.

(Oppenheimer Anurag Singh Thakur also got angry over the intimate scene and Bhagavad Gita controversy)

Oppenheimer Anurag Singh Thakur also got angry over the intimate scene and Bhagavad Gita controversy
Prajakta Mali: तु संन्यासी होणार वाटतंय! प्राजक्ताच्या 'आर्ट ऑफ लिव्हिंग' फोटोवर नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स

काय म्हणाले अनुराग सिंग ठाकुर?

TV9 च्या रिपोर्टनुसार सूत्रांचे म्हणणे आहे की, अनुराग ठाकूरने विचारले आहे की.. हा सीन कसा पास झाला? यासोबतच त्याने वादग्रस्त सीन डिलीट करण्यासही सांगितले आहे.

ख्रिस्तोफर नोलनच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ओपनहाइमर चित्रपटात एक दृश्य आहे, ज्यामध्ये चित्रपटाची अभिनेत्री फ्लोरेन्स पग ओपेनहाइमरची भूमिका करणारा अभिनेता सिलियन मर्फीला एका इंटीमेट दृश्यादरम्यान गीता वाचण्यास सांगते.

चित्रपट प्रदर्शित झाल्यापासूनच या सीनवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आता केंद्रीय मंत्री अनुराग सिंग ठाकुर याप्रकरणी कठोर झाले आहेत. याप्रकरणी काही जबाबदार अधिकाऱ्यांवरही कारवाई होऊ शकते, असंही सांगण्यात येत आहे.

कितीही असले वाद तरीही कमाई करतोय छप्परफाड

'ओपनहायमर' या सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतांना दिसत आहे. या सिनेमाच्या पहिल्या दिवशाच्या कमाईचे आकडे आता समोर आले आहेत.

'ओपनहायमर' चित्रपटाने भारतात 13.50 कोटींची ओपनिंग केली आहे. मोठी ओपनिंग घेणारा हा चित्रपट या वर्षातील पहिला हॉलिवूड चित्रपट ठरला आहे.

Oppenheimer Anurag Singh Thakur also got angry over the intimate scene and Bhagavad Gita controversy
Swanandi Tikekar: कुठेही मेकअपचा भपका नाही... स्वानंदीच्या साखरपुडा फोटोवर असलेली नेटकऱ्याची कमेंट चर्चेत

ओपनहायमर चा विक्रम

तर 12 जुलैला रिलीज झालेल्या 'मिशन इम्पॉसिबल 7'ने 12. 25 कोटींची ओपनिंग केली होती. त्याच वेळी, 19 मे रोजी रिलीज झालेल्या विन डिझेलच्या 'फास्ट एक्स'ने जवळपास 12 कोटींची ओपनिंग केली होती. त्यामुळे आता सर्वांत जास्त ओपनिंग देणारा हा पहिला सिनेमा ठरला आहे.

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘मिशन इम्पोसीबल 7’ आणि ‘फास्ट एक्स’ या दोन्ही चित्रपटांना मागे टाकत ‘ओपनहायमर’ भारतात पहिल्याच दिवशी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.