Oppenheimer: 'आमची 'भगवद्गगीता' अशी वापरलीच कशी?','ओपनहायमर' पाहिल्यानंतर नेटकऱ्यांचा संताप

Oppenheimer Review Christopher Nolan Movie Released :
Oppenheimer Review Christopher Nolan Movie Released :Esakal
Updated on

Oppenheimer Christopher Nolan Movie Released : गेल्या अनेक दिवसांपासून चर्चित असलेला हॉलिवूड सिनेमा ओपनहायमर हा आज प्रदर्शित झाला. गेल्या काही दिवसांपासून भारतात या सिनेमाची क्रेझ वाढली. नोलान यांच्या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित अशा ओपेनहायमर नावाच्या चित्रपटामध्ये प्रसिद्ध अभिनेता सिलियन मर्फी प्रमुख भुमिकेत आहे.

यावेळी त्याने सांगितलं की, मला या चित्रपटाच्या तयारीसाठी आणि प्रमुख भूमिकेसाठी भगवद्गगीतेची खूप मदत झाली. मी त्याचे पठण केले. मला त्याचा खूपच उपयोग झाला. या चित्रपटाचा ट्रेलर रिलिज झाल्यापासूनत सोशल मिडियावर या चित्रपटाची खुप चर्चा होती.

Oppenheimer Review Christopher Nolan Movie Released :
Manipur Violence: 'मणिपूरमधलं कृत्य घृणास्पद अन् ..' भाजप खासदार हेमा मालिनींची प्रतिक्रिया..

चित्रपटाची कथा 'अमेरिकन प्रोमिथियस' नावाच्या पुस्तकावर आधारित आहे, जो जे रॉबर्ट ओपेनहाइमरचा बायोपिक आहे. चित्रपटाला प्रेक्षकांनी आणि समिक्षकांनीही चांगली दाद दिली आहे.

पण याच दरम्यान 'ओपेनहायमर'मधील एका सीनवरून सध्या सोशल मिडियावर जोरदार वाद सुरू आहे. चित्रपटातील एका दृश्यात भगवद्गीतेचा वापर केल्याने सोशल मीडियावरील नेटकरी खुप संतापले आहेत. त्यांनी ट्विट करत याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

या चित्रपटाच्या एका दृश्यात दाखवण्यात आलं आहे की, ज्यावेळी चित्रपटातील अभिनेता आणि अभिनेत्री रोमांस करत असतात त्यावेळी ती अभिनेत्याला गीता वाचायला सांगते.

Oppenheimer Review Christopher Nolan Movie Released :
Oppenheimer Review : अमेरिका जशी डोक्यावर घेते तशीच ती...! 'ओपनहायमर'ला बोटावर नाचवलं

आता ट्विटरवर या दृश्यावरुन खुप वाद सुरु झाला आहे.

एका युजरने ट्विट केले की, 'ओपनहायमर' पाहून आता बाहेर आलो. चित्रपटात एक दृश्य होते ज्यात एक नग्न स्त्री भगवद्गीता पकडून 'ओपेनहायमर' ला श्लोक वाचण्यास सांगत आहे. मी शॉकमध्ये आहे. अशा दृश्यात माझ्या धार्मिक ग्रंथाचा वापर करण्याची काय गरज होती?

तर दुसऱ्या युजरने ट्विट केले आहे की, जर तुम्ही सनातनी असाल आणि तुम्हाला भगवद्गीतेचा संदर्भ असलेला 'ओपेनहायमर' पाहायचा असेल तर चित्रपट पाहू नका.

Oppenheimer Review Christopher Nolan Movie Released :
Alia Bhatt Daughter: 'लेकीला हिरोईन नाही तर बनवायचयं... 'आलियाचा खुलासा

बहुतेक नेटकऱ्यांनी या सीन आक्षेप घेत लव्ह मेकिंग दरम्यान असा दरम्यान भगवद्गीता वापरायला नको होती असं सांगतिलं आहे तर काहींना यात काही आक्षेप घेण्यासारख वाटलेलं नाही.

एका युजरने ट्विट केले की, "मी आज हा चित्रपट पाहिला, त्यात एक सीन आहे जिथे 'ओपेनहाइमर' रोमान्स केल्यानंतर लगेचच त्याच्या लायब्ररीतून गीता दाखवतो आणि तो त्यातून तिला उदाहरण सांगते आणि पुन्हा ते पुन्हा प्रेम करू लागतात... मला या सीनमध्ये काहीही चुकीचं वाटत नाही... छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देऊ नका.

तर दुसऱ्याने लिहिलयं की, यात गीतेचा सीन आहे पण मला वाटत नाही की धर्माची किंवा त्याच्या पुस्तकाची खिल्ली उडवण्याच्या हेतूनं त्यांनी तसं काही केलं असावं. आता सोशल मिडियावर हे ट्रेंड करु लागलं आहे आणि नेटकरी यावर प्रतिक्रिया देत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.