Cillian Murphy : 'ओपेनहायमर'ची भूमिका साकारायची कळल्यावर पहिली 'भगवद्गगीता' वाचली!

हॉलीवूडची फिल्म ओपेनहायमर सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. त्याच्या प्रदर्शित झालेल्या ट्रेलरनं चाहत्यांना खूश केले आहे.
Cillian Murphy
Cillian Murphyesakal
Updated on

Oppenheimer actor Cillian Murphy : जगप्रसिद्ध दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलानचा चित्रपट प्रदर्शित होणार असे कळताच त्याच्या चाहत्यामध्ये त्या नवीन चित्रपटाविषयी कमालीची उत्सुकता असल्याचे दिसून येते. गेल्या काही दिवसांपासून नोलान यांच्या ओपेनहायमरविषयी कमालीची चर्चा आहे. त्याच्याविषयी होणारी चर्चा खूप काही सांगून जाणारी आहे.

हॉलीवूडची फिल्म ओपेनहायमर सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. त्याच्या प्रदर्शित झालेल्या ट्रेलरनं चाहत्यांना खूश केले आहे. नोलान हे नेहमीच त्याच्या आगळ्या वेगळ्या धाटणीच्या चित्रपट निर्मितीसाठी ओळखले गेले आहे. यापूर्वीच्या त्यांच्या इंटरस्टेलर, टेनेंट या चित्रपटांना जगभरातून मिळालेला प्रतिसाद कौतूकास्पद म्हणावा असाच होता. त्यानंतर बऱ्याच प्रतिक्षेनंतर त्यांची दुसरी कलाकृती समोर येणार आहे.

Also Read - Indian Politics :पक्षाचे 'आयकॉन' पळवून भारतात निवडणूक जिंकता येईल का?

Oppenheimer actor Cillian Murphy
Oppenheimer actor Cillian Murphy

नोलान यांच्या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित अशा ओपेनहायमर नावाच्या चित्रपटामध्ये प्रसिद्ध अभिनेता सिलियन मर्फी प्रमुख दिसणार आहे. त्याच्या अभिनयाची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. ओपेनहायमरच्या प्रमोशनच्या निमित्तानं सिलियननं ज्या मुलाखती दिल्या आहेत. त्यानं काही गोष्टींचा केलेला उल्लेख हा लक्ष वेधून घेताना दिसतो आहे. त्याची सोशल मीडियावर होणारी चर्चा खूप काही सांगून जाणारी आहे.

सिलियननं भारतीय परंपरा आणि संस्कृती याविषयी टिप्पणी केली आहे. ख्रिस्तोफर नोलान यांची ओपेनहायमर नावाची फिल्म ही प्रसिद्ध शास्त्रज्ञ रॉबर्ट ओपेनहायमर यांच्या आयुष्यावर आधारित असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांनी अणूबॉम्बचा शोध लावत त्यावर संशोधन केले होते. अणुबॉम्बच्या निर्मितीचे श्रेय ओपेनहायमर यांना दिले जाते. गेल्या काही वर्षांपासून नोलान यांच्या या चित्रपटावरुन वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चांना उधाण येत आहे.

ओपेनहायमर यांची प्रमुख भूमिका साकारणाऱ्या सिलियननं सांगितले की, मला जेव्हा ओपेनहायमर यांची भूमिका करण्याचा प्रस्ताव आला तेव्हा ते आव्हान आपण काहीही झाले तरी स्विकारायचे असे मी ठरवले. मला या चित्रपटाच्या तयारीसाठी आणि प्रमुख भूमिकेसाठी भगवद्गगीतेची खूप मदत झाली. मी त्याचे पठण केले. मला त्याचा खूपच उपयोग झाला. एका मुलाखतीमध्ये सिलियननं त्याच्या भूमिकेविषयी सविस्तरपणे सांगितले आहे.

Oppenheimer actor Cillian Murphy
Oppenheimer actor Cillian Murphyesakal

ओपेनहायमर यांनी १९४५ मध्ये जेव्हा पहिला अणुबॉम्ब तयार केला. तेव्हा त्याच्या परिक्षणानंतर ओपेनहायमर यांना गीतेमधील एक श्लोक आठवला होता. संस्कृतचे विद्यार्थी असलेल्या ओपेमहायमर यांनी म्हटले होते की, मी आता मृत्यू झालो आहे, या विश्वाचा संहार करणारा...सिलियनं म्हटलं की, मी ओपेनहायमरची भूमिका साकारण्यापूर्वी गीतेचे पठण केले. त्यात खूपच सुंदर पाठ आहेत. आणि ते खूपच प्रेरणादायी असल्याचे सिलियननं सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()