Oppenheimer Controversy : 'ओपनहायरमनं गीता वाचली याचं कौतूक, भारतीयांना फक्त...'!

समीक्षकांनी देखील या चित्रपटावर कौतूकाचा वर्षाव केला आहे. जगभरातून आतापर्यत ओपनहायमरनं कोट्यवधीचा व्यवसाय केला आहे.
Oppenheimer Controversy
Oppenheimer Controversy esakal
Updated on

Oppenheimer Controversy : सध्या हॉलीवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलनच्या ओपनहायमर नावाच्या दिग्दर्शकानं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. सोशल मीडियावर देखील त्या दिग्दर्शक आणि त्याच्या चित्रपटाची चर्चा सुरु आहे. सध्या त्यातील वेगवेगळ्या विषयांमुळे हा चित्रपट वादाचे कारण ठरताना दिसत आहे. यासगळ्यावर बॉलीवूडमधील अनेक दिग्गजांनी या चित्रपटावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

ओपनहायमरनं जगभरामध्ये आपल्या नावाची वेगळी ओळख निर्माण केली आहे. अणुबॉम्बचा जनक जे रॉबर्ट ओपनहायमर यांच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटानं प्रेक्षकांची, सिनेअभ्यासकांची पसंती मिळवली आहे. समीक्षकांनी देखील या चित्रपटावर कौतूकाचा वर्षाव केला आहे. जगभरातून आतापर्यत ओपनहायमरनं कोट्यवधीचा व्यवसाय केला आहे. भारतातून देखील ओपनहायरमरनं मोठी कमाई केली आहे. यात या चित्रपटामध्ये भगवद्गगीतेचा संदर्भ आल्यानं खळबळ उडाली आहे.

Also Read - Adhik Shravan Maas : अधिक श्रावण मास चित्तशुद्धीचा पर्वकाळ

वास्तविक ओपनहायमरनं अणुबॉम्बची पहिल्यांदा चाचणी केली होती. त्यावेळी त्यानं गीतेतील एका श्लोकाचा संदर्भ दिला होता. त्याचा अर्थ असा की, आता मीच काळ आहे. मीच सगळ्यांचा संहार करणार आहे. चित्रपटामध्ये देखील हा संदर्भ येतो. मात्र तो च्या प्रसंगात येतो त्यावरुन वाद निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. यावरुन भारतीय प्रेक्षकांनी आणि नेटकऱ्यांनी नोलनवर तीव्र शब्दांत टीका केली आहे. काही धार्मिक संघटनांनी देखील त्यावरुन नोलनला धारेवर धरले आहे.

बॉलीवूडमधील काही सेलिब्रेटींनी यावरुन प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यात महाभारत मालिकेत श्रीकृष्णाची भूमिका करणाऱ्या नितेश भारद्वाज, माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी प्रतिक्रिया देत नाराजी व्यक्त केली आहे. जगभरामध्ये वंदनीय असणाऱ्या भारतीय संस्कृतीबाबत वेगवेगळ्या प्रकारचा प्रचार अन् प्रसार होत असल्याचे दिसून आले आहे. जे हे सुरु आहे त्याचा गांभीर्यानं विचार करायला हवा. असे त्या सेलिब्रेटींनी म्हटले आहे.

यासगळ्यात बॉलीवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांच्या प्रतिक्रियेनं अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यांनी म्हटले आहे की, मुळात टीकेचा विषय हा आहे की, एका अमेरिकेन अणुशास्त्रज्ञ ओपनहायरमनं भगवद्गगीता वाचली होती. त्यामुळे मला खात्री आहे की ०.०००००१ टक्के भारतीयांनी देखील गीता वाचली असेल. राम गोपाल वर्मा यांच्या या ट्विटचं काहींनी कौतूक केलं आहे तर काहींनी त्यांच्यावर प्रचंड टीका केली आहे.

Oppenheimer Controversy
Oppenheimer Review : अमेरिका जशी डोक्यावर घेते तशीच ती...! 'ओपनहायमर'ला बोटावर नाचवलं

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.