Oscar 2023 : RRR वर बोलताना जिमी किमेलची जीभ घसरली, 'तो तर...' ऑस्करमध्ये पुन्हा नवा वाद!

भारताच्या वाट्याला दोन ऑस्कर आले असून त्यात द एलिफंट व्हिस्फर्स या माहितीपटाला आणि आरआरआर चित्रपटातील नाटू नाटू या गाण्याला ऑस्कर मिळाला आहे.
Oscar 2023 Jimmy Kimmel Comment
Oscar 2023 Jimmy Kimmel Comment
Updated on

Oscar 2023 Jimmy Kimmel Comment : यंदाचा ऑस्कर सोहळ्याची सांगता होता होता तो वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. भलेही भारतीय चित्रपट आरआरआऱनं यावर्षी भारताला ऑस्कर मिळवून दिलं असलं तरी ऑस्करचं होस्टिंग करणाऱ्या जिमीमुळे तो चित्रपट पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. त्याला वेगळ्याच वादाचा रंग आल्याचे दिसून आले आहे.

भारताच्या वाट्याला दोन ऑस्कर आले असून त्यात द एलिफंट व्हिस्फर्स या माहितीपटाला आणि आरआरआर चित्रपटातील नाटू नाटू या गाण्याला ऑस्कर मिळाला आहे. यासगळ्यात जिमीनं आरआऱआर चित्रपटाच्या नावाची घोषणा करताना जे शब्द वापरले त्यावरुन वेगळ्याच वादाला सुरुवात झाली आहे.

Also Read - देशातले ३२ म्युच्युअल फंडांचं व्यवस्थापन आहे महिलांच्या हाती...

Oscar 2023 Jimmy Kimmel Comment
Oscars 2023: नाटू नाटू गाण्याविषयी माहित नाहीय?.. दीपिकानं थोडक्यात मांडला RRR चा इतिहास अन् सभागृह गेलं दणाणून..

त्याचं झालं असं की, ऑस्कर २०२३ सोहळ्याचे होस्टिंग करणाऱ्या जिमनं त्याच्या सुरुवातीच्या अनाउसमेंटमध्ये आरआरआऱला बॉलीवूड फिल्म म्हटलं. त्यामुळे त्याच्यावर आता टीका होताना दिसत आहे. मुळातच हा चित्रपट कोणत्याही एका भागाचे प्रतिनिधीत्व करत नसून तो पूर्ण भारताचे प्रतिनिधीत्व करत आहे. त्यामुळे जिमीनं जी प्रतिक्रिया दिली आहे, त्याच्यावरुन सोशल मीडियावर मोठा वाद निर्माण झाला आहे.

खरं तर जिमी किमेलनं तीन वेळा ऑस्करच्या पुरस्कार सोहळयात सहभाग घेतला आहे. त्यामुळे त्याच्या बोलण्याचे पडसाद तीव्रपणे सोशल मीडियावर उमटताना दिसत आहे. त्याच्या प्रतिक्रियेनं तेलुगू सिनेप्रेमी चांगलेच भडकले आहेत. जिमीनं बोलताना विचार केला नाही. तो काहीही बोलून गेला. RRR ही तेलुगू भाषेतील भारतीय फिल्म आहे. त्यामुळे तो जे काही बोलला ते चुकीचेच आहे. असेही नेटकऱ्यांनी म्हटले आहे.

ऑस्करला तर वादाविषयी जास्त प्रेम!

दुसऱ्या एका नेटकऱ्यानं लिहिलं आहे की, आम्हाला असे वाटते, ऑस्करला वादाविषयीच जास्त प्रेम आहे. कारण दरवर्षी कोणत्या चित्रकृतीला ऑस्कर मिळाल्यानंतर त्याच्यावर बोलण्याऐवजी वाद कसा निर्माण करता येईल,चाहत्याचे लक्ष कसे वेधून घेता येईल हे ऑस्करच्या समितीला चांगले जमले आहे. गेल्या काही महिन्यांपासून आरआरआरची टीम त्यांचा चित्रपटाचा प्रचार हा बॉलीवूडची फिल्म म्हणून नव्हे तर भारताच्या वतीनं ऑस्करसाठीची फिल्म असा प्रचार केला होता.

आता RRR ही बॉलीवूडची फिल्म असा जो उल्लेख केला जातो आहे त्यावरुन पुन्हा एकदा वेगळा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न होतो आहे. RRR च्या वतीनं काहीवेळेला तेलुगू भाषेतील चित्रपट असा प्रचार केला गेला होता. वास्तविक हा भारतीय चित्रपटाचे प्रतिनिधीत्व करणारा चित्रपट आहे अशी प्रतिक्रिया एका नेटकऱ्यानं दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.