विल स्मिथवर Academy नं केली कारवाई सुरु; Oscar परत घेण्याची दाट शक्यता

यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात ख्रिस रॉकला लगावलेली थप्पड विल स्मिथला चांगलीच महाग पडणार असं दिसत आहे.
Will Smith
Will SmithGoogle
Updated on

यंदाच्या ऑस्कर पुरस्कार(Oscar Award 2022) सोहळ्यात ख्रिस रॉकला(Chris ROck) लगावलेली थप्पड विल स्मिथला(Will SMith) चांगलीच महाग पडणार असं दिसत आहे. पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करणारी संस्था 'अॅकॅडमी ऑफ मोशन पिक्चर्स आर्ट्स अॅन्ड सायंसेज' नं यासंदर्भात दंडात्मक कारवाई करण्यासं सुरुवात केली आहे. विल स्मिथ विरोधात कडक पावलं या कारवाई अंतर्गत उचलली जातील अशी बातमी सध्या जोर धरतेय. कदाचित विल स्मिथकडून ऑस्कर पुरस्कार परत मागितला जाऊ शकतो. अद्याप या अशाप्रकारच्या कारवाईवर शिक्कामोर्तब झालेलं नाही. सूत्रांच्या माहितीनुसार,अॅकॅडमी चे अध्यक्ष डेव्हिड रूबिन आणि सीईओ डॉन हडसन यांनी विल स्मिथशी झूम मीटिंगच्या माध्यमातून बातचीत केली आहे. जवळपास अर्धा तास चाललेल्या या मीटिंगमध्ये थप्पड प्रकरणाविषयी संक्षिप्त रुपात बातचीत करण्यात आली आहे. या मीटिंगमध्ये विल स्मिथने पुन्हा झालेल्या प्रकरणाबद्दल माफी मागितली आहे.

Will Smith
मिस.युनिव्हर्स हरनाझ संधूला Celiac Disease, वजन झपाट्यानं वाढतंय...

विल स्मिथने या मीटिंगमध्ये सांगितले की,त्याला माहित आहे जे केलंय त्याचे परिणाम काय होणार आहेत. किंग रिचर्ड साठी उत्कृष्ट अभिनेत्याचा प्रथम पुरस्कार जिंकणाऱ्या विल स्मिथने सर्व अधिकाऱ्यांसमोर आपण असं का केलं याविषयी आपली बाजू मांडली आहे. विल म्हणाला, ''रॉकने माझी पत्नी जेडा पिंकेट च्या केसांवरुन विनोद केला. जेडानं 'एलोपेसिया' या आजारामुळे आपले केस गमावले आहेत''. ही सगळी माहिती कानावर आली असली तरी अॅकॅडमीच्या अधिकृत निवेदनपत्रात या अशा प्रकारच्या मीटिंगचा उल्लेख करण्यात आलेला नाही. फक्त अॅकॅडमीच्या बोर्ड ऑफ गव्हर्नर्स च्या मीटिंगनंतर घोषणा करण्यात आली की विल स्मिथनं आचारसंहितेचं उल्लंघन केलं आहे आणि यामुळे कदाचित त्या यापुढे पुरस्कार सोहळ्यातून निलंबित केलं जाऊ शकतं किंवा इतरही काही बंधनं त्याच्यावर लादली जाऊ शकतात.

Will Smith
७०० करोड कमावल्यानंतर राजामौली म्हणतायत RRR बनवायचाच नव्हता,मला तर...

ऑस्कर २०२२ पुरस्कार सोहळ्यात थप्पड प्रकरणानंतर विल स्मिथला सभागृहातून जाण्यास सांगण्यात आले होते. पण त्यानं तिथून निघून जाण्यास नकार दिला होता असं कळत आहे. पण बातमी अशीही आहे की असं काहीच विल स्मिथला सांगण्यात आलं नव्हतं. उलट त्यानंतर विल स्मिथला 'किंग रिचर्ड'साठी उत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आणि त्यानं पाच मिनिटाचं भाषणही केलं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी विलनं एक निवेदनपत्र सोशल मीडियावर प्रसिद्ध केलं,ज्यात त्यानं ख्रिस रॉक,अॅकॅडमी आणि संबिधत लोकांची माफी मागितली आहे. अॅकॅडमीनं देखील या प्रकरणासाठी ख्रिस रॉकची माफी मागितली आहे. त्यावेळी ख्रिसनं संयम दाखवत शांत राहण्याचं काम केलं यासाठी त्याचे धन्यवाद मानले आहेत.

अभिनेता विल स्मिथनं सर्वांसमक्ष कॉमेडियन आणि कार्यक्रमाचा सूत्रसंचालक ख्रिस रॉकला कानशिलात लगावल्यानंतर लॉस एंजेलिस पोलिस देखील घटनास्थळी पोहोचले होते अशी बातमी आहे. पोलिसांनी स्मिथविरोधात रॉकला तक्रार करण्यास सांगितले होते. पण ख्रिस रॉकने तक्रार न केल्यानं पोलिस कारवाई करू शकले नाहीत. पण जर नंतर पुन्हा रॉकला याविषयी तक्रार करायची असेल तर आपण त्या तक्रारीची नोंद करुन कारवाई करु असं पोलिसांनी म्हटलं आहे. आता साऱ्यांचं लक्ष लागून राहिलंय ते नेमके कोणते निर्बंध विल स्मिथवर लागणार आणि ऑस्कर त्याच्याकडून परत घेतला जाणार का?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.