Oscar Awards 2022: उरले फक्त काहीच तास! ऑस्कर सोहळा कधी,कुठे,केव्हा?

यंदाही लॉस एंजेलिसच्या डॉल्बी थिएटरमध्ये ऑस्कर सोहळा मान्यवर सेलिब्रिटींच्या उपस्थितीत रंगणार आहे.
Oscar Award Image
Oscar Award ImageGoogle
Updated on

ऑस्कर (Oscar 2022)पुरस्कार सोहळ्याचं यंदाचं हे ९४ वं वर्ष आहे. सिनेजगतात सर्वोच्च समजल्या जाणाऱ्या पुरस्कार सोहळ्याची चर्चा तशी वर्षभर सुरू असते. सर्वात दर्जेदार बनलेल्या कलाकृती इथं एकत्र येतात अन् मग त्यातनं सर्वोत्त कलाकृतीचा शोध घेतला जातो. या पुरस्कार सोहळ्याची सिनेमाजगत चातकासारखी वाट पाहत असतं. नामांकन जाहिर होईपर्यंत ते ऑस्कर सोहळा साकारेपर्यंत निर्माते,दिग्दर्शक,कलाकार साऱ्यांच्याच हृद्याचे ठोके काहीसे जलद गतीनं धावतात. कोरोनामुळे दोन वेळा हा पुरस्कार सोहळा पुढे ढकलण्यात आला होता. पण अखेर २७ मार्चला ९४व्या पुरस्कार सोहळ्याची घोषणा केली जाईल. यंदाही लॉस एंजेलिसमधील डॉल्बी थिएटरमध्ये हा पुरस्कार सोहळा रंगणार आहे.

भारतातही या पुरस्कार सोहळ्याची उत्सुकता दिसून येते. सिनेप्रेमींना हा मानाचा पुरस्कार सोहळा पाहायचा असतो. पण अमेरिका अन् भारतीय वेळेत फरक असल्यामुळे याचं वेळापत्रक थोडं वेगळं बनतं. हा ९४ वा अकादमी पुरस्कार म्हणजेच ऑस्कर पुरस्कार २७ मार्च रोजी रात्री ८ वाजल्यापासून लॉस एंजेलिसमध्ये सुरू होईल. पण मगाशी म्हटलं तसं वेळेतील फरकामुळे भारतात सोमवारी २८ मार्च रोजी पहाटे ५.३० वाजल्यापासून हा सोहळा पाहता येईल. हा सोहळा Didney+Hotstar वर लाइव्ह पाहता येणार आहे.

त्यासोबतच Star World आणि Star Movies सकाळी ६.३० वाजता हा सोहळा प्रसारित होईल. तसेच,ऑस्करच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरनंही या पुरस्कार सोहळ्याचे अपडेट देण्यात येणार आहेत. आता सगळयांनाच प्रश्न असेल सकाळी पाच वाजता उठणं जमेल का,किंवा उठलं तर कामाच्या घाई-गडबडीत संपूर्ण सोहळा पाहता येईल का? तर चिंता नसावी. Disney+Hotstar वर लाइव्ह स्ट्रीम संपल्यानंतर हा संपूर्ण पुरस्कार सोहळा त्यावर पाहता येणार आहे. चुरशीची लढत यंदाही आहे,कोण जिंकेल याचे अंदाज लावले जात आहेत,पण नेमकं कोण ऑस्कर विजेता ठरेल यासाठी ऑस्कर २०२२ पुरस्कार सोहळा आहे तो चुकवू नका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.