Jamie Foxx: ऑस्कर विजेता अभिनेत्यावर महिलेने केला लैंगिक छळाचा आरोप! गुन्हा दाखल

ऑस्कर विजेता अभिनेत्यावर महिलेने केला लैंगिक छळाचा आरोप! गुन्हा दाखल
Oscar-Winning Actor Jamie Foxx Sued For Sexually Assaulting Woman In 2015
Oscar-Winning Actor Jamie Foxx Sued For Sexually Assaulting Woman In 2015Esakal
Updated on

Oscar-Winning Actor Jamie Foxx Sued For Sexually Assaulting Woman: हॉलिवूड अभिनेता जेमी फॉक्स हा सध्या चर्चेत आला आहे. तो आता नव्या अडचणीत सापडला आहे. ऑस्कर विजेता अमेरिकन अभिनेता जेमी फॉक्सवर 2015 मध्ये एका महिलेने लैंगिक छळ केल्याचा आरोप केला होता. त्या महिलेने अभिनेत्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. लैंगिक छळाच्या प्रकरणी बुधवारी जेमी विरोधात न्यायालयात माहिती दाखल करण्यात आली होती.

Oscar-Winning Actor Jamie Foxx Sued For Sexually Assaulting Woman In 2015
Alia Bhatt: पापाराझींनी दिलं आलियाला 'हे' टोपणनाव, अभिनेत्री वैतागून म्हणाली.. हे काय नवीन!

न्यायालयातील दस्तऐवजांमध्ये महिलेची ओळख लपवण्यात आली आहे. तिचे नाव जेन डो म्हणून दाखवण्यात आले आहे. दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्ट 2015 मध्ये न्यूयॉर्क शहरातील कॅच रेस्टॉरंटच्या छतावर जेमी फॉक्सने तिच्यावर हल्ला केला होता.

फॉक्सने तिच्या परवानगीशिवाय तिच्या खाजगी भागांना जाणीवपूर्वक स्पर्श केला आणि तिच्यासोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्या महिलेने केला होता. न्यूयॉर्क कोर्टाने त्या प्रकरणाची चौकशी केली तेव्हा तो कायदेशीर अडचणीत सापडला आहे.

Oscar-Winning Actor Jamie Foxx Sued For Sexually Assaulting Woman In 2015
Ekda Yeun Tar Bagha: काय सांगता! भाऊ कदम यांच्या दर्शनाला भाविकांच्या लांब रांगा, काय घडलं असं?

आरोपपत्रात म्हटले आहे की, एका सुरक्षा रक्षकाने तिच्यासोबत गैरवर्तन करताना पाहिले मात्र त्याने हस्तक्षेप केला नाही. त्या महिलेच्या मैत्रिणीने हे सर्व पाहिले आणि त्या महिलेचा बचाव केला. यानंतर महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

Oscar-Winning Actor Jamie Foxx Sued For Sexually Assaulting Woman In 2015
ORRY In Bigg Boss 17: बॉलिवूड सेलिब्रिटींचा बेस्ट फ्रेंड ओरी करणार 'बिग बॉस 17' मध्ये एंट्री! 'वीकेंड का वार' मध्ये होणार धमाका!

आता कोर्टात आरोपपत्र दाखल करताना महिलेने तिला झालेल्या मानसिक त्रासाबदद्ल भरपाई मागितली आहे. आता या प्रकरणी जेमीच्या अडचणी वाढणार असल्याचं बोललं जात आहे. खटला दाखल केल्यानंतर त्या महिलेने सेटलमेंट करण्यासाठी काही अटी सांगितल्या असून त्याचा खुलासा केलेला नाही.

मात्र जेमी फॉक्सवर असे गैरवर्तन आणि छेडछाडीचा आरोप होण्याची ही पहिलीच वेळ नाही. त्याच्यावर 2018 मध्ये, MeToo चळवळीदरम्यान एका महिलेने लैंगिक छळाचे आरोप केले होते. ही घटना 2002 मध्ये घडली होती. मात्र, जेमी फॉक्सने दरवेळी हे आरोप फेटाळून लावले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.