RRR movie natu natu song oscars 2023 : चित्रपट जगतात सर्वोच्च मानाला जाणारा ऑस्कर पुरस्कार आज लॉसएंजलिस येथे मोठ्या दिमाखात पार पडला. यंदाचे वर्ष भारतीयांसाठी खूपच महत्वाचे ठरले.
कारण अवघ्या भारताचे लक्ष लागले होते ते 'एसएस राजामौली यांच्या RRR चित्रपटातील नाटू नाटू या गाण्याकडे. या गाण्याला सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याच्या श्रेणीत नामांकन मिळाले होते आणि अखेर 'नाटू नाटू'नं ऑस्कर पटकावलाच.
केवळ पुरस्कार मिळवला नाही तर या सोहळ्यात 'नाटू नाटू' हे गाणं सादर झालं आणि अक्षरशः उपस्थित सर्व कलाकार भारावले. सर्वांनी या गाण्याला उभं राहुल टाळ्यांची दाद दिली. त्यामुळे पुन्हा एकदा या गाण्याची चांगलीच हवा झाली आहे.
पण हे गाणं तयार करणं इतकं सोप्पं नव्हतं.. आज ऑस्करच्या निमित्ताने पाहूया या गाण्याचा प्रवास कसा होता..
नाटू नाटू गाण्यामध्ये रामचऱण आणि ज्युनियर एनटीआऱ यांनी ज्या उर्जेनं डान्स केला आहे त्याला तोड नाही. चाहत्यांना तो डान्स कमालीचा आवडला आहे. त्यातील स्टेप्स या सोशल मीडीयावर देखील कमालीच्या लोकप्रिय झाल्या होत्या.
यासगळ्यात त्या दोन्ही कलाकारांचे कौतूक करावे लागेल. त्या गाण्यासाठी त्यांनी जीव तोडून मेहनत घेतली होती. राजामौली यांनीही या गाण्यावर प्रचंड विश्वास दाखवला. नृत्य दिग्दर्शक रक्षित यांना गाण्याचे पूर्ण स्वातंत्र्य दिले. विशेष म्हणजे नाटू नाटू हे गाणं युक्रेनमधील राष्ट्रपतींच्या निवासस्थानाबाहेर शुट झाले होते. त्यासाठी निर्माते आणि दिग्दर्शकाला प्रचंड मेहनत घ्यावी लागली होती.
असं म्हणतात की, नाटू नाटू गाणं शुट करण्यासाठी दोन महिने लागले होते. या गाण्यात दोन्ही कलाकारांसाठी ११० मुव्ह्ज तयार करण्यात आले होत्या. त्या शुट करण्यासाठी वीस दिवस लागले . तर ४३ रिटेक्समध्ये हे गाणे शुट करण्यात आले.
रामचऱण आणि एनटीआर यांनी प्रचंड मेहनत घेऊन नाचले आणि गाण्याला न्याय दिला. दोन दाक्षिणात्य सुपरस्टार असे एकत्र नाचल्याने गाण्याला मोठी रंगत आली. विशेष म्हणजे दोन्ही कलाकारांच्या हालचाली सारख्या व्हायला हव्यात हाच या गाण्यातील मोठा शर्थीचा भाग होता. त्यासाठी दोन्ही कलाकार दिवसाला जवळपास 3 तास फक्त गाण्याचीच प्रॅक्टिस करत होते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.