Oscars 2022 : पुरस्कार सोहळा सुरु झाला, पण.. ही भानगड काय? कशी मिळते ही सोन्याची बाहुली?

जगातील बहुप्रतिष्ठीत आणि बहुप्रतिक्षीत अशा ऑस्कर (Oscars) पुरस्काराकडे जगाचे लक्ष लागलेले असते. आज पहाटे या पुरस्कार सोहळ्याला सुरुवात झाली. पण ऑस्कर म्हणजे नेमकं काय, या पुरस्काराची पार्श्वभूमी आणि तो मिळवण्याची प्रक्रिया काय हे जाणून घेऊया....
oscars 2022
oscars 2022google
Updated on

चित्रपट क्षेत्रातील महत्वाचा आणि मानाचा समजला जाणारा ऑस्कर (oscar) पुरस्काराचे हे ९४वे वर्ष. आज २८ मार्च २०२२ रोजी पहाटे ५.३० वाजता या पुरस्काराच्या पारितोषिक वितरण सोहळ्याला सुरुवात झाली. लॉस एंजेलिसमध्ये २७ मार्च रात्री ८ वाजता होणारा हा सोहळा वेळेतील फरकामुळे भारतात २८ मार्च पहाटे ५.३० वाजल्यापासून हा सोहळा पाहता येणार आहे. यंदाच्या सोहळ्याचे विशेष म्हणजे हॉलिवूड अभिनेता बेनेडिक्ट कंबरबॅच याची (benedict cumberbatch ) मुख्य भूमिका असलेल्या ‘द पॉवर ऑफ डॉग’ या चित्रपटाला सर्वाधिक १२ नामांकने मिळाली आहेत. तर भारतातून 'रायटिंग विथ फायर’ या भारतीय माहितीपटाला नामांकन मिळाले आहे.

oscars 2022
Shah Rukh Khan : ५६ व्या वर्षीही तब्येत अशी की पाहून डोळे फिरतील..

ऑस्कर पुरस्काराला पारितोषिकाच्या स्वरूपावरून 'सोन्याची बाहुली' देखील म्हटले जाते. हा पुरस्कार अमेरिकेतील ‘अकादमी ऑफ मोशन पिक्चर्स आर्ट्स अँड सायन्स’ (Academy of Motion Picture Arts and Sciences) या संस्थेतर्फे प्रदान केला जातो. जागतिक स्तरावर चित्रपट क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांना हा पुरस्कार दिला जातो.

oscars 2022
'मोबाईल थिएटर ही शाहीर साबळेंची संकल्पना '.. केदार शिंदेंनी सांगितल्या आठवणी

चित्रपट हा कला आणि तंत्रज्ञानाने अधिक प्रगत व्हावा या उद्देशाने १९२७ मध्ये या अकादमीची स्थापना करण्यात आली होती. अशी अकादमी उभी राहावी हि मेट्रो-गोल्डिन-मेयरचे तत्कालीन प्रमुख आणि सह-संस्थापक लुई बी. मेयर यांची संकल्पना होती. लॉस एंजेलिसच्या अॅम्बेसेडर हॉटेलमध्ये हॉलिवूडमधील विविध चित्र शाखांमध्ये पारंगत असणाऱ्या ३६ जणांना बोलावून एक चर्चा घडवण्यात आली. या चर्चेतून अकादमी आकार घेत गेली. त्यावेळी हॉलिवूडमधील ज्येष्ठ कलाकार आणि अकादमीचे संस्थापक सदस्य डग्लस फेअरबँक्स हे या अकादमीचे पहिले अध्यक्ष म्हणून निवडले गेले. सध्या ९ हजाराहून अधिक चित्रपट व्यवसायिक या संस्थेचा भाग आहेत. त्यात अंदाजे ५० भारतीय सदस्य आहेत.

oscars 2022
भारती सिंग या दिवशी होणार आई, म्हणाली कधीही येऊ शकतं बाळ...

अकादमीमध्ये एकूण १७ शाखा असून चित्रपट निर्मितीशी संबंधित कोणताही कलाकार या अकादमीचा सदस्य असू शकतो. त्या सदस्याला १७ शाखांपैकी एक शाखा निवडावी लागते. दिग्दर्शक, अभिनेते, संपादक, लेखक, सिनेमॅटोग्राफर, कॉस्च्युम डिझायनर, डॉक्युमेंटरी, मेकअप आर्टिस्ट/हेअरस्टाइलिस्ट, संगीत, निर्माते, प्रोडक्शन डिझाईन, शॉर्ट फिल्म/फिचर अॅनिमेशन, ध्वनी आणि व्हिज्युअल परिणाम अशा १७ शाखा आहेत.या शाखांमध्ये समाविष्ट होत नसलेल्या व्यक्तीला मेम्बर्स एॅट लार्ज (Members-at-Large) या क्षेणीद्वारे सदस्यत्व दिले जाते.

ऑस्करसाठी केले जाणारे नामांकन हे कागदी किंवा ऑनलाईन मतपत्रिका वापर करुन केले जातात. सदस्याने निवडलेल्या शाखेतील कलाकारांनाच तो मत देऊ शकतो. म्हणजे दिग्दर्शन शाखेतील सदस्य केवळ दुसऱ्या दिग्दर्शकालाच नामांकित करु शकतो. केवळ सर्वोत्कृष्ट चित्रपट या श्रेणीसाठी सर्व शाखांतील सदस्यांना मत देण्याचा अधिकार आहे. ही प्रक्रिया 'प्राइस वॉटरहाऊस कूपर्स' या अकाऊंटींग फर्म द्वारे केली जाते.

oscars 2022
बॉलिवूड अभिनेत्रीसोबत अजित पवारांच्या मुलाचा फोटो चर्चेत..

ही प्रक्रिया अत्यंत कठीण असते. आपला चित्रपट अकादमीच्या प्रत्येक सदस्यापर्यंत पोहोचवण्यासाठी एक एजंट नेमावा लागतो. हा तिथल्या व्यवस्थपनाचा भाग आहे. त्यांनतर चित्रपटाची जागतिक मूल्य तपासली जातात. पुढे नामांकित व्यक्तींमधून विजेते निवडण्याची प्रक्रिया सोपी आहे. नामांकन मिळाल्यावर सर्व श्रेणींमध्ये अकादमीचे सदस्य मत देऊ शकतात. ऑस्कर सोहळ्यात विजेत्याचे नाव जाहीर होईपर्यंत केवळ प्राइस वॉटरहाऊस कूपर्स या फर्मलाच विजेत्यांबद्दल माहिती असते. ही माहिती अत्यंत गोपनीय ठेवली जाते. त्यामुळे या पुरस्काराला जगामध्ये सर्वोच्च स्थान आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.