2018 Everyone is a Hero या मल्याळम चित्रपटाची ऑस्कर 2024 साठी भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड करण्यात आली आहे. याची घोषणा नुकतीच करण्यात आली. हा चित्रपट '2018 एव्हरीवन इज अ हिरो' च्या केरळच्या पुरावर आधारित एक ड्रामा आहे.
ज्युड अँथनी जोसेफ दिग्दर्शित या चित्रपटात टोविनो थॉमस, कुंचाको बोबन, आसिफ अली, विनीत श्रीनिवासन, नारायण आणि लाल यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.
या वर्षी मे महिन्यात प्रदर्शित झालेल्या '2018' या मल्याळम चित्रपटाने 100 कोटींची कमाई केली. आता या चित्रपटाने आणखी एक मोठी कामगिरी केली आहे. या चित्रपटाने आता थेट ऑस्करमध्ये मजल मारली आहे. '2018' या मल्याळम चित्रपटाला ऑस्कर 2024 साठी भारताकडून अधिकृत एंट्री देण्यात आली आहे.
केवळ 12 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये '2018' या चित्रपटाची निर्मीती करण्यात आली होती. 5 मे रोजी हा सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट जागतिक स्तरावर सर्वाधिक कमाई करणारा मल्याळम चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. सुरवातीला मल्याळम आणि नंतर हिंदी, तमिळ, तेलगू आणि कन्नडमध्ये हा सिनेमा रीलीज करण्यात आला.
'2018 एव्हरीवन इज अ हिरो' च्या स्टोरीबद्दल सांगायचं तर हा चित्रपट 2018 साली आलेल्या केरळ पुरावर आधारित आहे. पुरासारख्या समस्येवर मात करणाऱ्या लोकांची गोष्ट या चित्रपटात उत्तमरीत्या दाखवण्यात आली आहे. 2018 मध्ये आलेल्या केरळच्या महापुराने राज्याची मोठ्या प्रमाणात नासधूस केली होती. सत्य घटनेवर आधारित या चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले.
'द केरळ स्टोरी'पासून 'रॉकी और रानी की प्रेम कहानी', 'मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे', तेलुगू चित्रपट 'बालागम', मराठी चित्रपट 'वाळवी', 'बापल्योक' आणि 16 ऑगस्ट, 1947, अशा 22 चित्रपटांचा समावेश होता ज्यात आता '2018' या चित्रपटाने मजल मारली आहे. आता हा चित्रपच ऑस्करमध्ये कमाल करेल की नाही याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.