Oscars 2024: ऑस्कर पुरस्कार (Oscars 2024) हा सिनेसृष्टीतील सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या पुरस्कारांपैकी एक आहे. दरवर्षी या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केलं जातं. यंदा ऑस्कर पुरस्कार सोहळा कॅलिफोर्नियातील डॉल्बी थिएटरमध्ये पार पडला. या सोहळ्याला विविध सेलिब्रिटींनी आणि सिनेसृष्टीतील दिग्गजांनी हजेरी लावली. अभिनेता सिलियन मर्फीनं (Cillian Murphy ) आणि अभिनेत्री एम्मा स्टोननं ऑस्कर पुरस्कारावर नाव कोरलं आहे. सिलियनला 'ओपेनहायमर' (Oppenheimer) या चित्रपटातील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता या श्रेणीतील ऑस्कर पुरस्कार देण्यात आला आहे तर अभिनेत्री एम्मा स्टोनला पुअर थिंग्स या सिनेमासाठी ऑस्कर मिळाला.
यंदा ऑस्कर पुरस्कार सोहळ्यातील सर्वोत्कृष्ट अभिनेता या श्रेणीतील पुरस्कारासाठी ब्रॅडली कूपर (मेस्ट्रो),कोलमन डोमिंगो (रस्टिन), पॉल गियामट्टी (द होल्डओव्हर्स), सिलियन मर्फी (ओपनहायमर), जेफ्री राइट (अमेरिकन फिक्शन) या अभिनेत्यांना नामांकन मिळालं होतं. यापैकी सिलियन मर्फीनं ऑस्करवर नाव कोरलं आहे.
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री या कॅटेगिरीतील पुरस्कारासाठी ऍनेट बेनिंग (न्याड),लिली ग्लॅडस्टोन (किलर ऑफ द फ्लॉवर मून), सँड्रा हुलर (अँटॉमी ऑफ अ फॉल), केरी मुलिगन (मेस्ट्रो), एम्मा स्टोन (पुअर थिंग्स) या अभिनेत्रींना नामांकन मिळालं होतं. यापैकी एम्मा स्टोन या अभिनेत्रीनं ऑस्कर पुरस्कार जिंकला आहे.
ख्रिस्तोफर नोलनच्या 'ओपेनहायमर' या चित्रपटाला यंदा ऑस्करमध्ये 13 नामांकने मिळाली. तसेच बार्बी, पुअर थिंग्ज आणि किलर्स ऑफ द फ्लॉवर मून या चित्रपटांना देखील नामांकने मिळाली आहेत.
'ओपेनहायमर' या चित्रपटातील सिलियन मर्फीच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं होतं. या सिनेमाचं दिग्दर्शन ख्रिस्तोफर नोलन यांनी केलं. या सिनेमानं जगभरतील बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला.
10 मार्च रोजी ऑस्कर-2024 हा पुरस्कार सोहळा पार पडला. या सोहळ्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग भारतात आज सकाळपासून होत आहे. डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर या पुरस्कार सोहळ्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग करण्यात आलं. हा पुरस्कार सोहळा कॉमेडियन जिमी किमेलनं होस्ट केला आहे.
गेल्या वर्षी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा ऑस्कर पुरस्कार मिशेल योहला 'एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल अॅट वन्स' मिळाला तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या ऑस्करनं ब्रेंडन फ्रेझर गौरवण्यात आलं होतं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.