OTT Anurag Thakur said will not allow insult to Indian culture - ओटीटी प्लॅटफॉर्म्सवरील कंटेट यावरुन गेल्या काही महिन्यांपासून वाद होताना दिसतो आहे. सध्या भारतीय प्रसारण मंत्रालय आणि माहिती सुचना केंद्र यांच्याकडून कोणत्याही स्वरुपाच्या लेखी सुचना या माध्यमासाठी नसल्यानं कित्येक ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर अश्लीलतेचा होणारा भडिमार अनेकांच्या चिंतेचा विषय आहे.
विदेशी ओटीटी माध्यमांच्या धर्तीवर भारतात देखील अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली ओटीटीवर प्रदर्शित होणाऱ्या मालिका, चित्रपटांतील कंटेट बाबत अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. यामध्ये मनोरंजन विश्वातील काही सेलिब्रेटींचा देखील समावेश आहे. यासगळ्यात केंद्रीय माहिती, सुचना व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
Also Read - Adhik Shravan Maas : अधिक श्रावण मास चित्तशुद्धीचा पर्वकाळ
कोरोना दरम्यान ओटीटी माध्यमांचा झालेला प्रचार आणि प्रसार हा प्रचंड वेगवान होता. प्रेक्षकांना ओटीटीची सवय लावण्यात संबंधित कंपन्यांना बऱ्याचशा प्रमाणात यशही आले. कित्येक कंपन्यांनी यासाठी भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूकही केली. ओटीटीमुळे कित्येक वेगवेगळ्या भाषांमधील कलाकारांना या माध्यमात काम करण्याची संधी मिळाली असली तरी या माध्यमातून जो कंटेट प्रेक्षकांसमोर येतो आहे त्यावरुन पालकांनी, प्रेक्षकांनी आणि काही सेलिब्रेटींनी नाराजी व्यक्त केली होती.
आता प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी ओटीटीसाठी खास नियमावली तयार करण्याचे संकेत दिले आहे. यापूर्वी देखील ओटीटीवरील कंटेटवरील निर्बंधासाठी सरकारकडून काही धोरणांची आखणी करण्यात आली होती. ओटीटी प्लॅटफॉर्मवरील आक्षेपार्ह कंटेटवर बंदी आणण्यासाठी सरकारच्यावतीनं एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये काही महत्वाच्या गोष्टींची चर्चा करण्यात आली.
याविषयी अधिक माहिती देताना अनुराग ठाकूर म्हणाले की, ओटीटीवर जो अश्लील कंटेट, आक्षेपार्ह शब्द, भाषा यांचा प्रयोग केला जातो त्यावर आता बंधनं आणली जाणार आहेत. ओटीटीवरील कंटेट हा सर्वच वयोगटातील प्रेक्षक पाहत असतात. त्यांच्यावर होणारा परिणाम हा गंभीर विषय आहे. याचा विचार निर्माते, दिग्दर्शक करत नाही. आपली कलाकृती प्रेक्षकांपर्यत प्रभावीपणे पोहचावी यासाठी ते ज्याचा आधार घेतात त्याचा होणारा परिणाम किती भयानक आहे हे जाणून घेण्याची गरज आहे.
यापुढील काळात ओटीटी ब्रॉडकास्टर्सनं आपल्याकडून चुकीचा कंटेट प्रसारित होणार नाही याची काळजी घ्यावी. जर अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि सिनेमॅटिक लिबर्टी यांच्या नावाखाली काहीही प्रसारित होत असेल, त्यातून भारतीय संस्कृतीचा अपमान होणार असेल तर त्या कलाकृतीला (मालिका अथवा चित्रपट) यांना परवानगी दिली जाणार नाही. असेही ठाकूर यांनी यावेळी स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.