Suresh Gopi : आपली भारतीय संस्कृती ही अत्यंत प्राचीन आहे तिच्यामागे इतिहास आहे. ही संस्कृती केवळ मिथ नाही तर ती एक विज्ञान आहे. याच संस्कृतीने जगाला वेगवेगळ्या प्रकारची धार्मिक अध्यात्मिक ज्ञान आणि तत्वज्ञान शिकवले आणि वसुदेव कुटुंबकम ही शिकवण दिली ही शिकवण आणि आमची संस्कृती आपल्या पुढील पिढीपर्यंत पोहोचयाला हवी.
यासाठी सर्वांनी योगदान द्यावे असे आवाहन मल्याळम चित्रपट अभिनेते व माजी खासदार सुरेश गोपी यांनी मुंबईत केले. दि आस्तिक समाज संस्थेच्या वतीने माटुंगा येथील कोचू गुरूवयुर मंदिराला १०० वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर मल्याळम चित्रपट अभिनेते व माजी खासदार सुरेश गोपी यांच्या हस्ते लोगोचे आणि डिजिटल हुंडीचे अनावरण करण्यात आले.
त्यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी मुंबईतील आस्तिक समाज संस्थेचे संचालक सी एस परमेश्वर, सी व्ही सुब्रमण्यम, सचिव रामास्वामी, रामकृष्णन आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी धर्मरक्षा समितीकडून गोपी यांना छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती भेट देण्यात आली.
अभिनेते सुरेश गोपी पुढे म्हणाले, मुंबई ही एक आर्थिक राजधानी आहे परंतु याच राजधानी मध्ये शंभर वर्षांपूर्वी आस्तिक समाज संस्थेच्या वतीने कोचू गुरूवयुर मंदिराची स्थापना झाली आणि हा समाज आणि संस्कृती या शहरात रुजली आणि तिने यात आपल्याला सामावून घेतले. त्यामुळे हे शहर सांस्कृतिक शहर देखील असल्याचे ते म्हणाले.
कार्यक्रमाची सुरुवात कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदनेने झाली.यावेळी दिव्या अय्यर आणि धन्या अय्यर या दोघींनी गणेश वंदना करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. तर कार्यक्रमाची प्रस्तावना संस्थेचे संचालक सी एस परमेश्वर यांनी केली.
यावेळी त्यांनी मागील शंभर वर्षात दी आस्तिक समाज संस्थेने केलेल्या धार्मिक, आध्यात्मिक, सांस्कृतिक आदी कार्यक्रमाची यावेळी माहिती दिली. धार्मिक आध्यात्मिक कार्यक्रम प्रत्येक दिवशी होतात, केंद्र सरकार या मंदिरावर पोस्ट तिकीट काढणार आहे. त्यासाठी मान्यता दिली आहे. त्याची माहिती दिली. क्लासिकल नृत्य, संगीत आदींना येथे प्रेरणा दिली असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच आस्तिक समाजाच्या तत्कालीन दानशूर आणि धार्मिक व्यक्तींनी माटुंगा येथे १९२३ साली कोचू गुरूवयुर मंदिर स्थापन केले, या मंदिरात कार्तिकेय, नवग्रहा, गुरूवायूरापन आदींच्या मूर्ती स्थापित करण्यात आल्या.
केरळातील गुरूवायूरापन या प्रसिद्ध मंदिराची प्रतिकृती या मंदिरात बसविण्यात आल्याने हे मंदिर गुरूवायूरापन मंदिराचे प्रतीमंदिर म्हणून ओळखले जाते. येथे हरिकथा प्राणायाम, नृत्य, वेद आणि पुराण, सुंदरकांड पारायण, भागवत सप्ताह, स्वामी आय्यापान दिवस, यावर आधारित विविध कार्यक्रम होतात अशी माहिती अय्यर यांनी दिली. यावेळी अनिता एस टी यांनी गीता गोविंदा या संगीतमय अल्बम आणि त्याची माहिती दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.