Pahije Jatiche: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची शिकवण मांडणारा, 'पाहीजे जातीचे' सिनेमाचा ज्वलंत ट्रेलर एकदा पहाच

पाहीजे जातीचे हा चित्रपट लवकरच चित्रपटगृहात आपल्या भेटीस येत आहे.
'Pahije Jatiche' marathi movie based on teachings of dr Babasaheb Ambedkar starring sayaji shinde
'Pahije Jatiche' marathi movie based on teachings of dr Babasaheb Ambedkar starring sayaji shinde SAKAL
Updated on

Pahije Jatiche Movie Trailer News: ‘वाचायला शिका, विचार करायला शिका आणि महत्त्वाचं म्हणजे प्रश्न विचारायला शिका’ अशी शिकवण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिली.

याच शिकवणीचा धागा पकडत ज्येष्ठ लेखक विजय तेंडुलकर यांनी ‘पाहिजे जातीचे’ हे अजरामर नाटक लिहिले.

या नाटकावर आधारित ‘पाहिजे जातीचे’ हा चित्रपट लवकरच आपल्या भेटीसाठी सज्ज आहे. १५ जुलैला या चित्रपटाता ट्रेलर लॉन्च करण्यात आला.

('Pahije Jatiche' marathi movie based on teachings of dr Babasaheb Ambedkar starring sayaji shinde)

'Pahije Jatiche' marathi movie based on teachings of dr Babasaheb Ambedkar starring sayaji shinde
R Madhavan on PM Modi: मोदींसोबत सेल्फी, एकत्र जेवण.. आर माधवनने केलं पंतप्रधानांचं कौतुक

कबड्डी नरेंद्र बाबू दिग्दर्शित आणि डॉ. मल्लिकार्जुन एन. गजरे यांची निर्मिती असलेला ‘पाहिजे जातीचे’ हा चित्रपट सामाजिक, सांस्कृतिक विषयांवर भाष्य करणारा आणि प्रश्न विचारणारा चित्रपट आहे, असे ट्रेलरवरून दिसून येते.

यात विक्रम गजरे, ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे, संजना काळे हे कलाकार मुख्य भूमिकेत असून पुन्हा एकदा सयाजी शिंदे आपला हटले अभिनय सादर करण्यासाठी तयार आहेत.

एका लहान गावातील महिपती या महत्त्वाकांक्षी तरूणाची कथा असून, केवळ जातीमुळे समाज त्याचे पाय खेचू पाहतो, मात्र त्यातूनही तो यशस्वी भरारी कशी घेतो, यावर आधारलेला हा चित्रपट आहे.

ट्रेलर लॉन्चच्या कार्यक्रमास कलाकार सयाजी शिंदे, विक्रम गजरे, संजना काळे, दिलीप अहिरे, निर्माते डॉ. मल्लिकार्जुन एन. गजरे, लेखक-दिग्दर्शक कबड्डी नरेंद्र बाबू, संवादलेखिक उमा कुलकर्णी, संगीत दिग्दर्शक अन्वेषा हे उपस्थित होते.

'Pahije Jatiche' marathi movie based on teachings of dr Babasaheb Ambedkar starring sayaji shinde
Abhishek Bachchan Politics: अभिषेक बच्चनची राजकारणात एन्ट्री? या पक्षाकडून निवडणुक लढवण्याच्या तयारीत

आजच्या काळातही जातीच्या एका लेबलमुळे होतकरू मुलांचे आयुष्य धुळीस मिळण्याचे मोठे प्रमाण दिसून येते.

त्यामुळे जातीपातीत न अडकता केवळ हुशारी आणि गुणांच्या जोरावर प्रगती केली पाहिजे ही शिकवण देणारा हा चित्रपट लवकरच चित्रपटगृहात आपल्या भेटीस येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.