पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी सांगितली, दिलीप कुमारांची 'मदतीची आठवण'

आपल्या अभिनयानं त्यांनी भारतीय प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केले.
imran khan and dilip kumar
imran khan and dilip kumar Team esakal
Updated on

मुंबई - भारतीय चित्रपटसृष्टीतील महान अभिनेते दिलीप कुमार (dilip kumar) यांचे वार्धक्यानं निधन झाले. त्यांच्या जाण्यानं बॉलीवूडवर मोठी शोककळा पसरली आहे. केवळ भारतातच नाही तर जगभरात त्यांचा चाहतावर्ग होता. आपल्या अभिनयानं त्यांनी भारतीय प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केले. आगळ्या वेगळ्या शैलीतील त्यांच्या अभिनयाच्या आठवणी आजही प्रेक्षकांच्या मनात ताज्या आहेत. त्यांच्या जाण्यानं बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. दुसरीकडे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (pakistan pm imran khan) यांनीही दिलीप कुमार (dilip kumar) यांची एक आठवण सांगितली आहे. (pakistan pm imran khan tribute to dilip kumar his death how he helped them)

दिलीप कुमार आणि त्यांची पत्नी सायरा बानो (syra banno) यांचे पाकिस्तान कनेक्शन सर्वांना माहिती आहे. त्यांना पेशावर बद्दल विशेष जिव्हाळा होता. आपल्या बालपणीच्या अनेक आठवणी त्या भागाशी जोडल्या गेल्या आहेत असे ते सांगत असत. इम्रान खान यांनी जो एक प्रसंग सांगितला आहे त्यातून दिलीप कुमार यांनी सरहदीच्या सीमा ओलांडून माणूसकीचं नातं कशाप्रकारे जोपासले हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. खान यांनी आपल्या व्टिटच्या माध्यमातून कुमार यांचे कौतूक करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

इम्रान खान यांनी सांगितले आहे की, दिलीप कुमार यांच्या जाण्याचे दु;ख आहे. त्यांनी एका कॅन्सर हॉस्पिटलसाठी जो निधी गोळा करायचा होता तेव्हा मोलाची मदत केली होती. तो प्रोजेक्ट लाँच करण्याचा आमचा प्रयत्न होता. त्याकामी कुमार यांनी मोठी मदत केली. त्यावेळी त्यांच्या उदारतेचा आम्हाला प्रत्यय आला. त्यांच्यामुळे मोठी मदत आम्हाला मिळाली होती. माझ्या पिढीचे दिलीप कुमार हे महान आणि प्रतिभाशाली अभिनेते होते.

imran khan and dilip kumar
दिलीपकुमार यांचे नाशिकशी जिव्हाळ्याचे ऋणानुबंध; पाहा विडिओ
imran khan and dilip kumar
मोहम्मद युसूफ खानचा 'दिलीप कुमार' कसा झाला?

दिलीप कुमार यांच्यामुळे पाकिस्तान आणि लंडनमधून आम्हाला मोठया प्रमाणात निधी मिळाला होता. दुसरीकडे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील दिलीप कुमार यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी लिहिले आहे की, दिलीप कुमार आमच्यासाठी एक लिजंड अभिनेता होते. त्यांची प्रतिभा जबरदस्त होती. येणाऱ्या पिढीसाठी देखील त्यांचा अभिनय हा प्रेरणादायी असेल यात शंका नाही. त्यांच्या जाण्यानं आमच्या सांस्कृतिक विश्वाचे मोठे नुकसान झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.