Mahira Khan: राजकारण्यांसाठी बळीचे बकरे...', बॉलिवूडमध्ये बंदी घातल्यानंतर माहिरा संतापली

Mahira Khan
Mahira KhanEsakal
Updated on

पाकिस्तानची प्रसिद्धी अभिनेत्री आणि शाहरुख खानच्या 'रईस' चित्रपटातील सहकलाकार माहिरा खानला तिच्या दमदार अभिनय आणि स्पष्टवक्तेपणामूळे खास ओळखले जाते. माहिराची पाकिस्तानात नाही तर भारतातही जबरदस्त फॅन फॉलोवर्स आहे. सध्या तिचा ब्लॉकबस्टर चित्रपट'द लीजेंड ऑफ मौला जट' ला सगळीकडे पसंती मिळत आहे‌.

मात्र तिचा हा चित्रपट भारतात प्रदर्शित करण्याची तयारी करत असतांना राजकीय नेत्यांनी याचा विरोध केला आहे. तसंच पाकिस्तानी कलाकारांना बॉलिवूडमध्ये बंदी असल्याच्या मुद्द्यावरून माहिराने संताप व्यक्त केला आहे.

Mahira Khan
Pakistani Film Controversy: पाकिस्तानी कलाकार आणि चित्रपटाबाबत मनसेचा आक्षेप का आणि कशासाठी?

एका मुलाखतीत माहिराने सांगितले की, "भारतात तसेच पाकिस्तानमध्ये देखील कलाकारांना "सॉफ्ट टार्गेट" मानले जाते. दुसऱ्या शब्दांत, दोन्ही देशातील कलाकार हे राजकारण्यासाठी बळीचे बकरे बनले आहेत. दुर्दैवाने, हे राजकारण आहे, ही कोणतीही वैयक्तिक समस्या नाही. दुसऱ्या शब्दांत, दोन्ही देशातील कलाकार हे राजकारण्यांसाठी बळीचे बकरे आहेत."

Mahira Khan
Bigg Boss16: बिगबॉसच्या घरातील वाद नडणार...विकासला घरातून हाकललं?

"दुर्दैवाने, हे राजकारण आहे, ही वैयक्तिक समस्या नाही. दोन्ही बाजूंनी जेव्हा एखाद्याला 'बळीचा बकरा' लागतो तेव्हा आम्ही नेहमीच पहिले असू.. पण ते चांगले होते. समजा सत्तेत कोणी असेल तर ते चांगले होईल. आमचा सॉफ्ट टार्गेट म्हणून वापर करू नका. तुम्ही कल्पना करू शकता का की दोन्ही देश कलेवर एकत्र काम करत आहेत? ते किती सुंदर असेल." 

Mahira Khan
The Legend Of Maula Jatt India Release: पाकिस्तानी चित्रपट भारतात प्रदर्शित होणार! रणवीरच्या 'सर्कस'शी टक्कर

भारतात काम करण्याच्या तिच्या अनुभवाबद्दल बोलताना, अभिनेत्री म्हणाली, 'भारतात काम करण्याचा माझा वेळ सर्वात आश्चर्यकारक होता... मी अजूनही अनेक लोकांच्या संपर्कात आहे . आम्ही कलाकार आहोत आणि आपण कलेच्या धाग्याने जोडलेले आहोत, जे एकमेकांना कुठेतरी भेटतात. त्यामुळे आम्ही प्रत्येक गोष्टीपेक्षा एकमेकांची काळजी घेण्याचा प्रयत्न करतो. आताही सोशल मीडियावर आपण काय लिहितो, याची खूप काळजी घेतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.