तुम्हाला कुणाची माफी मागायची आहे किंवा प्रेम व्यक्त करायचं आहे तर ते करून टाका, कारण तो क्षण दुसऱ्यांदा येणार नाही असंही सबाने म्हटलं.
बॉलिवूड अभिनेता इरफान खान याच्या निधनाला जवळपास ११ महिने होत आले. जगभरात त्याच्या अभिनयाचे चाहते होते. इरफान खानसोबत हिंदी मीडियम या चित्रपटात काम केलेली पाकिस्तानी अभिनेत्री सबा कमरने त्याची आठवण सांगताना दु:ख व्यक्त केलं आहे. तिने म्हटलं की, मला पश्चाताप होतोय की मी त्यांच्या संपर्कात नव्हते. जेव्हा मला समजलं की, ते आता या जगात नाहीत तेव्हा मला धक्का बसला होता.
सबा कमर ही पाकिस्तानी अभिनेत्री असून तिने हिंदी मीडियम या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कारकिर्द सुरु केली होती. २०१७ मध्ये आलेला हा चित्रपट हिट ठरला होता. पाकिस्तानी असणाऱ्या सबाची वेबसिरीज लवकरच रिलीज होणार आहे. त्याचे प्रमोशन सध्या सुरु आहे. यानिमित्ताने पिंकव्हिलाशी बोलताना सबाने इरफान खानबद्दल आठवण सांगितली. सबा म्हणाली की, मला याचा पश्चाताप आहे. चित्रपटानंतर जेव्हा त्यांची प्रकृती बिघडली तेव्हा त्यांना फोन करायचा विचार करत होते. मात्र शूटिंग आणि प्रवासात बिझी असल्यानं फोन करता आला नाही.
एक दिवस अचानक त्यांच्या निधनाबद्दल समजलं. त्यावेळी मला वाटलं की, जी वेळ आहे त्याचा वापर करायला पाहिजे, कारण वेळ पुन्हा येत नाही. जर तुम्हाला कुणाची माफी मागायची आहे किंवा प्रेम व्यक्त करायचं आहे तर ते करून टाका, कारण तो क्षण दुसऱ्यांदा येणार नाही. मला याचा पश्चाताप आहे की, मी त्यांना कॉल करायला हवा होता. त्यांच्याशी बोलणं झालं असतं, त्यांच्या संपर्कात राहिले असते असंही सबा कमरने म्हटलं.
सबाने सांगितलं की, ती इरफान खान यांच्या कुटुंबियांच्या संपर्कात नाही. इरफान खान यांच्यासोबत कामाबद्दल सांगताना ती म्हणाली की, ते खूप चांगले अभिनेते होते आणि एक चांगला माणूसही होते. त्यांच्यासोबत काम करून मजा आली. तसंच खूप काही शिकता आलं.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.