Pakistani Actors in India: बॉम्बे हायकोर्टाचा निर्णय, पाकिस्तानी कलाकारांवरील बंदी उठवली, आता बॉलिवूडमध्ये...

पाकिस्तानी कलाकारांवर भारतात काम करण्याची बंदी उठवण्यात आलीय
Pakistani artists to be seen again in bollywood films, web series bombay hc decision fawad khan ali zafar
Pakistani artists to be seen again in bollywood films, web series bombay hc decision fawad khan ali zafarSAKAL
Updated on

गेल्या काही वर्षांपासुन पाकिस्तानी कलाकार भारतीय मनोरंजन विश्वात काम करत नाहीय. त्यांच्यावर बंदी घालण्यात आलीय, हे सर्वांना माहितच आहे.

2016 मध्ये URI हल्ल्यानंतर अभिनेते, अभिनेत्री, गायक आणि संगीतकारांसह पाकिस्तानी कलाकारांवर भारतात बंदी घालण्यात आली होती. परंतु नुकतंच बॉम्बे हायकोर्टाने दिलेल्या निर्णयानुसार पाकिस्तानी कलाकारांवरील बंदी उठवण्यात आली आहे.

(Fawad Khan, mahira khan, ali jafar and other Pakistani artists to be seen in bollywood films, web series again bombay hc decision)

Pakistani artists to be seen again in bollywood films, web series bombay hc decision fawad khan ali zafar
Sam Bahadur: "सिनेमात कलाकार कमी आणि...", दिग्दर्शक मेघना गुलजार यांचा सॅम बहादूरसाठी महत्वाचा निर्णय

काही दिवसांपुर्वी एका सिनेकर्मीने पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. आपल्या याचिकेत त्याने भारतीय सेलिब्रिटींना पाकिस्तानी कलाकारांसोबत काम करण्यापासून दूर राहण्यास सांगितले आहे.

आता मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी त्यांच्या निर्णयात माहिरा खान, फवाद खान यांसारख्या कलाकारांना भारतीय चित्रपट आणि वेब सिरीजमध्ये काम करण्याची परवानगी दिली आहे. बॉम्बे हायकोर्टाच्या या निर्णयाने पाकिस्तानी कलाकारांचा भारतीय मनोरंजन विश्वात काम करण्याचा मार्ग मोकळा झालाय. (Latest Marathi News)

लाइव्ह लॉने दिलेल्या वृत्तानुसार, बॉम्बे हायकोर्टाने भारतीय चित्रपट निर्मात्यांना पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालण्याची याचिका फेटाळून लावली आहे आणि म्हटले आहे की, ''देशभक्ती ही देशावर असलेल्या भक्तीमध्ये आहे, त्याचा अर्थ दुसऱ्याशी शत्रुत्व करणे असा होत नाही.''

या निर्णयामुळे फवाद खान, अली जफर, माहिरा खान, सबा कमर अशा लोकप्रिय पाकिस्तानी कलाकारांचा भारतीय सिनेमांमध्ये अभिनय करण्याचा मार्ग मोकळा झालाय.

Pakistani artists to be seen again in bollywood films, web series bombay hc decision fawad khan ali zafar
Malaika Arora: श्रेया बुगडेच्या समोर आली मलायका अरोरा, मग पुढे झालं असं काही की... व्हिडीओ व्हायरल

न्यायमूर्ती सुनील बी शुक्रे आणि न्यायमूर्ती फिरदोश पी पुनीवाला यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. पुनीवाला यांनी विधान केले की, या याचिकेत योग्यता नाही आणि भारत सरकारने आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षितता वाढवण्यासाठी सकारात्मक पाऊल उचलले आहे.

बॉम्बे हायकोर्टाने असेही नमूद केले की, हा निर्णय एक दिलासा आहे. यामुळे सांस्कृतिक सलोखा, एकता आणि शांततेत वाढ होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.