Viral Video : मास्टरशेफ शोमध्ये दुकानातून बिर्याणी घेऊन आली, परिक्षक म्हणाले, बाहेर निघ!

कुकिंग रियॅलिटी शो मास्टर शेफ इंडियाची सध्या मोठ्या प्रमाणात चर्चा आहे. यासगळ्यात पाकिस्तानमधील मास्टर शेफ - द किचन मास्टरमधील एक क्लिप व्हायरल होताना दिसत आहे.
Viral Video
Viral Video esakal
Updated on

Pakistani Master Chef Funny Video : कुकिंग रियॅलिटी शो मास्टर शेफ इंडियाची सध्या मोठ्या प्रमाणात चर्चा आहे. यासगळ्यात पाकिस्तानमधील मास्टर शेफ - द किचन मास्टरमधील एक क्लिप व्हायरल होताना दिसत आहे. त्यामध्ये जो प्रसंग घडला तो नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय आहे. परिक्षकांनी देखील स्पर्धकाच्या अशा तऱ्हेवाईकपणामुळे चिडल्याचे दिसून आले आहे.

त्याचे झाले असे की, त्या शोमध्ये सहभागी झालेल्या महिला स्पर्धकानं चक्क दुकानातून बिर्याणी आणली. आणि ती परिक्षकांना खाऊ घातली. त्यामुळे चिडलेल्या परिक्षकांनी तिला थेट बाहेर जाण्याची विनंती केली. यापुढे तुम्हाला या स्पर्धेमध्ये सहभागी होता येणार नाही. तुम्ही स्पर्धेच्या नियमांचे उल्लंघन केले आहे. असे मत परिक्षकांनी नोंदवले आहे.

Also Read - कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...

सोशल मीडियावर त्या महिलेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसतो आहे. अनेकांनी या व्हिडिओला भारत-पाकिस्तान असा रंग दिला आहे. मनोरंजन क्षेत्रामध्ये देखील पाकिस्तान कशाप्रकारे फसवणूक करतो आहे अशा आशयाच्या प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत. मास्टर शेफच्या ऑडिशनमध्ये आलेल्या त्या स्पर्धकांनी लक्ष वेधून घेतले आहे.

Viral Video
Raveena Tondon : 'अजुनही मी लवंगी मिर्ची!'

पाकिस्तानी टीव्ही चॅनेल एक्सप्रेसवरील द किचन मास्टर नावाच्या शोमधील ती स्पर्धक नेटकऱ्यांच्या रडारवर आली आहे.याशोमध्ये स्पर्धकांना त्यांचे पाककौशल्य दाखविण्याची संधी दिली जाते. मात्र या स्पर्धकानं बाहेरुनच बिर्याणी मागवल्यानं परिक्षकांना यावेळी राग अनावर झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.